बाल विवाह रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना महत्वाच्या : जिल्हाधिकारी अभिजित राऊत

नांदेड : आपल्या गावामध्ये बालविवाह (Child marriage) होत असल्याची माहिती मिळल्यास त्याला आळा घालण्यासाठी ग्रामपातळीवर पोलीस (Police) तसेच ग्रामसेवक (Gram sevak) यांनी विशेष पुढाकार घेवून बालविवाहास प्रतिबंध करावा,अशा सूचना जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिल्या. (Preventive measures important to prevent child marriage  Collector Abhijit Raut)

 

 

बालविवाह निमुर्लन (Elimination of child marriage) जिल्हा कृती आराखडा (District Action Plan) विशेष आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात (Collector’s Office) आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. बैठकीला महिला व बालविकास अधिकारी रेखा काळम, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी विद्या आळणे, राज्य कार्यक्रम अधिकारी पुजा यादव, कार्यक्रम स्वयंसेवक आकाश मोरे, निलेश कुलकर्णी, दादाराव शिरसाठ उपस्थित होते.

 

आशाताई, अंगणवाडी सेविका (Ashatai, Anganwadi worker) यांच्या माध्यमातून बालक-पालक यांचे समुपदेशन करण्यात येत असले तरी गावात एखादा बालविवाह होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बऱ्याच वेळी भितीपोटी गावातील नागरिक पुढे येत नाहीत. यामुळे प्रशासकीय यंत्रणेने संतर्क राहून अशा गोष्टीला आळा घालावा, असे त्यांनी सांगितले. (Preventive measures important to prevent child marriage Collector Abhijit Raut)

 

बेटी बचाव व बेटी पढाव (Beti bachao Beti padhao) अंतर्गत तसेच आयसीडीएस मार्फत विविध उपक्रम आयोजीत करण्यात येऊन यात किशोरवयीन मुलीची शारिरिक तपासणी आवश्यक आहे. त्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात यावी. बालविवाह लावून देणाऱ्या संस्था व्यक्ती असतील त्यांचे समुदेशन केले पाहिजे. प्रत्येक बालविवाह प्रतिबंधक अधिकारी यांनी आपल्या अधिकार क्षेत्रात केलेल्या कारवाईचा अहवाल प्रत्येक महिन्याला सादर करण्याचे, निर्देश राऊत यांनी दिले.

 

नांदेड जिल्ह्यामध्ये 100 शाळेतील 13 हजार 267 मुलांना बालविवाह प्रतिबंधात्मक उपाययोजनाची माहिती देण्यात आली आहे. यापुढे सक्षम युवाशक्ती कार्यक्रमाच्या माध्यमातून युवक-युवती नांदेड जिल्ह्यातील गावांमध्ये जावून याविषी जनजागृती करणार आहेत. शाळामध्ये शिक्षकांमार्फत कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. (Preventive measures important to prevent child marriage Collector Abhijit Raut)

 

 

Web Title : Preventive measures important to prevent child marriage Collector Abhijit Raut 

Local ad 1