Diwali vacation 2025। नांदेड : राज्य शासनाच्या सूचनेनुसार राज्य मंडळाशी संलग्न प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तसेच कनिष्ठ महाविद्यालयांच्या दिवाळी सुट्टीत एकसंधता आणण्यासाठी आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. त्यानुसार नांदेड जिल्ह्यातील सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना १७ ऑक्टोबर २०२५ (शुक्रवार) ते ३१ ऑक्टोबर २०२५ (शुक्रवार) या कालावधीत दिवाळी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
पुणे मेट्रो विकेंड ऑफर – प्रत्येक तिकीटावर ३०% सूट | Pune Metro Weekend Discount
या कालावधीत विद्यार्थी, शिक्षक आणि प्रयोगशाळा सहाय्यक, प्रयोगशाळा परिचर यांना सुट्टीचा लाभ मिळणार आहे. मात्र, इतर शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना ही सुट्टी अनुज्ञेय राहणार नाही. सुट्टी संपल्यानंतर १ नोव्हेंबर २०२५ (शनिवार) पासून शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांचे नियमित वर्ग सुरु होतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना आणि पालकांना सुट्ट्यांचे नियोजन करण्यास मदत होणार असून, दिवाळी सण उत्साहात साजरा करण्याची संधी मिळणार आहे.