...

Zilla Parishad Election २०२५ । आता इच्छुकांचे जिल्हा परिषद गटाच्या आरक्षणाकडे लक्ष

पंचायत समिती सभापती पदांच्या आरक्षण ही रखडले

पुणे : आरक्षण सोडतीनुसार पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे सर्वसाधारण म्हणजेच खुल्या प्रवर्गासाठी जाहीर झाले आहे. मात्र, अद्याप जिल्हा परिषद गटांमधील आरक्षण निश्चित न झाल्याने अध्यक्षपदासाठी इच्छुकांची धाकधूक कायम आहे. साडेतीन वर्षांच्या प्रशासक राजवटीनंतर जिल्ह्यात अध्यक्ष होण्यासाठी इच्छुकांची मोठी जंत्री असल्याचे चित्र आहे.

 

MHADA Lottery Pune : गरीब खासदार-आमदारांसाठी म्हाडाच्या सोडतीत ११३ घरे राखीव

 

ग्रामीण विकास विभागाने जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण निश्चित केले असून तालुका पंचायत समिती सभापती पदांसाठीही संख्या निश्चित केली आहे. तरीदेखील जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण यांचे आरक्षण प्रलंबित असल्याने इच्छुकांना अंतिम निर्णयाची प्रतीक्षा आहे.

Gen Z ते Gen Beta : पिढ्यांचे वर्गीकरण आणि वैशिष्ट्ये | Generations Explained in Marathi

 

जिल्ह्यात जुन्या मावळत्या, माजी सदस्यांसह नव्या दमाचे इच्छुक मोठ्या संख्येने आहेत. निवडणुकीनंतर किमान २५ जुने सदस्य परत येण्याची शक्यता असून, त्यातील अनेकजण अध्यक्षपदासाठी प्रयत्नशील असतील. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांमध्ये अध्यक्षपदासाठी रस्सीखेच होणार आहे.

 

MHADA Pune Lottery 2025 । पुण्यात परवडणारी घरे मिळवण्याची मोठी संधी ; म्हाडाच्या घरांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

 

२०१७ च्या निवडणुकीनंतर शेवटची अडीच वर्षे अध्यक्षपद महिलांसाठी आरक्षित होते. याआधी दत्तात्रय भरणे, विजय कोलते, जालिंदर कामठे आणि प्रदीप कंद यांनी खुल्या प्रवर्गातून अध्यक्षपद भूषवले होते. आता २०२५ मध्ये चौथ्यांदा खुल्या प्रवर्गातील प्रतिनिधीला जिल्हा परिषद अध्यक्ष होण्याची संधी मिळणार आहे.

Local ad 1