भविष्यात कोणत्याही शेतकऱ्याला आत्महत्या करावी लागणार नाही, असे काम करणार ; मुलीच्या मनोगताने उपस्थितांचे डोळे पाणावले !
पुणे : “आम्हाला वडील नाहीत आणि आता आई पासूनही लांब राहून आम्ही शिक्षण घेत आहोत. आम्ही जिद्दीने शिक्षण घेऊन देशाचे जबाबदार नागरिक बनू आणि कोणत्याही शेतकऱ्यावर भविष्यात आत्महत्येची वेळ येणार नाही, असे काम करू ” असे मनोगत नांदेड जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची मुलगी दुर्गा क्षीरसागर (Durga Kshirsagar, daughter of a suicide farmer) हिने व्यक्त केले. (We will work so that no farmer will have to commit suicide in future)
सासवड जवळील वीर या गावातील अस्तित्व गुरुकुल या संस्थेत ही मुले शिकणार असून या शाळेच्या संचालिका गीता देगावकर यांनी या मुलांचे भवितव्य उज्ज्वल घडवण्यासाठी आपण सर्वजण मिळून एकत्रित प्रयत्न करू असे सांगितले.