पुराच्या पाण्यातून बैलगाडी नेणे शेतकऱ्याला बेतले जीवावर (killing the farmer)

वर्धा : सध्या मोठ्या प्रमाणात पाऊस होत असून, नदी-नाल्यांना पुर आला आहे. या पुरातून रस्ता ओलांडने जिवावर बेतू शकतो. असाच प्रकार वर्धा जिल्ह्यातून समोर आला आहे. एका शेतकऱ्याने बैलगाडीतून नाला ओलांडताना शेतकरी बैलासह वाहून गेला. (Trying to carry a bullock cart through flood waters, killing the farmer)

 

It is currently raining heavily, and rivers and streams are overflowing. Trying to cross the road through this flood can be life threatening. This has come to the fore from Wardha district. A farmer was swept away by a bullock cart while crossing the stream.
 नाल्याला आलेल्या पुरात वाहून गेलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याचे धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने दोन्ही बैलांचाही मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. नाल्यातील पुरातून बैलगाडी घेऊन जाण्याचा प्रयत्न शेतकऱ्याच्या जीवावर बेतला आहे. वर्धा जिल्ह्यातील तास येथील शेतकरी संतोष शंभरकर गुरुवारी बैलगाडीसह पुराच्या पाण्यात वाहून गेले होते. शुक्रवारी महसूल विभागाचे तलाठी प्रेम ढवळे यांना त्यांचा मृतदेह सापडला. (Trying to carry a bullock cart through flood waters, killing the farmer)

वर्धा जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे जिल्ह्यातील बहुतांश नदी, ओढे ओसंडून वाहत आहेत. समुद्रपूर तालुक्यातील तास या गावात शेतकरी संतोष शंभरकर यांनी नाल्याच्या पुरातून बैलगाडी हाकण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्यासह बैलगाडी वाहून गेली. बैलगाडीला जुंपलेला एक बैल काही अंतरावर मृतावस्थेत आढळला होता. त्यानंतर आता शेतकऱ्याचाही मृतदेह आळला आहे. (Trying to carry a bullock cart through flood waters, killing the farmer)

Local ad 1