लष्कर भागात पुलगेटजवळ जलवाहिनी फुटली

पुणे : पुणे लष्कर भागातील पुलगेटजवळ
जलवाहिनी फुटली असून, हजारो लिटर पाणी रस्त्यावर जात आहे. ही घटना सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली. (Water pipe burst near Pulgate in Lashkar area) 

 

 

 

 

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी ७.३० च्या दरम्यान पुणे लष्कर पाणी पुरवठा केंद्राची पुलगेट जवळील पाईप लाईन फुटली आहे.त्यामुळे हजारो लिटर पाणी वाया जात होते. या रास्ताने जाणारे नागरिक धोंडाप्पा नंदे यांनी तत्काळ पाणी पुरवठा केंद्रात धाव घेतली. मात्र, तिथे कोणीही नव्हते. नंदे यांनी ही माहिती कर्तव्य फाउंडेशनचे अध्यक्ष विकास भांबुरे यांना फोन करून माहीती दिली. (Water pipe burst near Pulgate in Lashkar area)

 

 

भांबुरे यांनी पाणीपुरवठय़ाचे कनिष्ठ अभियंता भटकर यांना संपर्क केला तेव्हा त्यांनी दुरुस्तीचे काम हाती घेत असून, लवकरच काम पूर्ण होईल असे सांगितले. (Water pipe burst near Pulgate in Lashkar area)

Local ad 1