दुपारी बारा वाजता शाळा उघडण्यासाठी आलेल्या शिक्षकाला ग्रामस्थांनी रोखलं

जिल्हा परिषदेच्या शाळेच्या शिक्षकांचा मनमानी कारभार

कंधार : तालुक्यातील कौठावाडी येथे जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा असून, येथे दोन शिक्षक कार्यरत आहेत. पंरतु मुख्याध्यापक आणि शिक्षक मनमानी कारभार करत त्यांना हवी तेंव्हा शाळा सूरू आणि बंद करत होते. ही बाब ग्रामस्थांच्या लक्षात आली. त्यांनी त्यांना विनंतीही केली. परंतु, शिक्षकांनी पूर्व सुचना न देता शाळा बंद ठेवली. तर दुपारी बारा वाजता शाळा उघडण्यासाठी आलेल्या शिक्षकाला संतप्त ग्रामस्थांनी रोखले. हा प्रकार मंगळवारी (दि.20)  घडला. (Villagers stopped the teacher who came to open the school at twelve o’clock in the afternoon) 

 

 

कौठावाडी जिल्हा परिषद शाळा ही दोन शिक्षकी असून, विद्यार्थी संख्या ३९ आहे. गेल्या काही दिवसांपासून शिक्षक आपल्या सोईनुसार शाळा बंद आणि सुरू करत होते. गावकऱ्यांनी यासंदर्भात शाळा वेळेत सुरू करून वेळेत बंद करा, अशी विनंती केली. मात्र, शिक्षकांनी आपल्या वर्तनात सुधारणा केली नाही.
मंगळवारी (20 सप्टेंबर) विद्यार्थी सकाळी नेहमीप्रमाणे शाळेत गेले. मात्र, गुरुजी न आल्याने विद्यार्थी वरांड्यातच खेळत होते. अकरा वाजले तरी शाळा उघडली नसल्याची बाब ग्रामपंचायत सदस्य आनंदा पवळे, सदाशिव पवळे व अन्य ग्रामस्थांच्या लक्षात आली. त्यांनी तात्काळ शाळेत जाऊन विद्यार्थ्यांशी चर्चा केली. गुरुजी आले का, याची चौकशी केली.

 

 

दरम्यान, अकरा वाजले तरी शाळा बंद असल्याची बाब ग्रामस्थांनी सरपंच प्रतिनिधी शिवकुमार देशमुख यांना कळवली. त्यानंतर तपासाचे चक्र फिरले. देशमुख यांनी केंद्र प्रमुख संतोष दिनकर यांना फोन करून शाळा बंद असल्याची बाब निदर्शनास आणून दिली. तसेच शाळेत जाऊन प्रत्यक्ष पंचनामा करून वरिष्ठांना पाठवा असे सांगितले. (Villagers stopped the teacher who came to open the school at twelve o’clock in the afternoon)

 

 

ग्रामस्थ संतप्त झाल्याची माहिती एका शिक्षकाला मिळाली, त्यावेळी शिक्षक महाशय धावतपळत दुपारी बारा वाजता शाळेत पोहोचले. परंतु, शाळेतच तळ ठोकून असलेल्या ग्रामस्थांनी त्या शिक्षकाला शाळा उघडण्यास मज्जाव केला. शाळेवर केंद्र प्रमुख आल्यानंतर ग्रामस्थांच्या समक्ष पंचनामा सुरू करण्यात आला. त्यावेळी हजेरी पटावरून मुख्याध्यापक दोन दिवसांपासून शाळेकडे फिरकलेच नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली. यावेळी केंद्र प्रमुख दिनकर यांनी मुख्याध्यापकाला तुम्ही कुठे हा असे विचारले असता, मी आजारी असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, प्रत्यक्षात आजारी असल्यास तसे वरिष्ठांना कळवणे आवश्यक होते. त्यांनी कोणाला कळवले होते का हे संशोधनाचा विषय आहे.

 

कारवाई झाली पाहिजे

आमच्या गावातील ३९ विद्यार्थी या शाळेत आहेत, शिक्षक मनमानी पद्धतीने काम करत आहेत. त्यांना आपल्या कर्तव्याची जाणीव करून दिली होती. तरीही त्यांच्या वर्तनात सुधारणा झाली नाही. आमच्या मुलांच्या आयुष्या सोबत खेळण्याचा प्रयत्न सुरू आहे. या शिक्षकांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. (Villagers stopped the teacher who came to open the school at twelve o’clock in the afternoon)

 

 

Local ad 1