Employment fair | बेरोजगार युवतींसाठी रोजगार मेळावा ; कधी व कुठे होणार जाणून घ्या

नांदेड : जिल्ह्यातील मुलींना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, किनवट व कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभाग नांदेड व समाज कल्याण कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त तथा टाटा ईलेक्ट्रॉनिक्स प्रा. लि. होसुर यांचे संयुक्त विद्यमाने मंगळवार 27 सप्टेंबर रोजी माहुर, किनवट आणि हिमायतनगर तालुक्यातील मुलींसाठी महात्मा ज्योतीबा फुले, कनिष्ठ महाविद्यालय, गोकुंदा, किनवट येथे सकाळी 9 वाजता आणि बुधवार 28 सप्टेंबर रोजी यशवंत महाविद्यालय, बाबानगर, नांदेड येथे सकाळी 10 वाजता रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. (Employment fair for unemployed girls; Find out when and where)

 

 

या रोजगार मेळाव्यात जिल्हयातील 18 ते 21 वयाच्या बेरोजगार युवतींनी वेळेवर उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवटचे प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी किर्तीकिरण एच. पुजार यांनी केले आहे. (Employment fair for unemployed girls; Find out when and where)

 

 

या मेळाव्यामध्ये टाटा ईलेक्ट्रॉनिक्स प्रा.लि.कंपनीच्यावतीने मुलाखती घेण्यात येणार आहेत. यासाठी किमान शैक्षणिक पात्रता 12 वी किंवा कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. याबाबत काही अडचण असल्यास कार्यालयाचा दुरध्वनी क्रमांक (02462)-251674 किंवा ई-मेल आयडी nandedrojgar@gmail.com वर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त रेणुका तम्मलवार यांनी केले आहे. (Employment fair for unemployed girls; Find out when and where)

Local ad 1