गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला नाना पेठेत खून ; वनराज आंदेकर हत्येच्या बदल्याची चर्चा
गेल्या वर्षी 1 सप्टेंबरला वनराजची झाली होती हत्या
पुणे – माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्येचा बदला घेण्याची मालिका पुन्हा पेटली आहे. पहिला प्रयत्न पोलिसांनी विफल केला होता, मात्र आता दुसऱ्या टप्प्यात आंदेकर हत्येतील आरोपी गणेश कोमकर याचा मुलगा गोविंद कोमकर याची नाना पेठेत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.
राज्यात अतिवृष्टीमुळे १४ लाख हेक्टर शेती बाधित | नांदेडमध्ये सर्वाधिक नुकसान
गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या या घटनेमुळे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. हल्लेखोरांनी गोविंदवर तीन गोळ्या झाडल्या, ज्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.
गोविंदचा वडील गणेश कोमकर हा राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या गेल्या वर्षी (१ सप्टेंबर) झालेल्या हत्येतील आरोपी होता. या प्रकरणात पोलिसांनी २३ हल्लेखोरांना अटक केली होती.
वनराज आंदेकर यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी आंदेकर गटाला शस्त्रसाठा पुरवल्याच्या संशयावरून टीपू पठाण टोळीतील दोन कुख्यात गुन्हेगारांना पोलिसांनी नुकतेच अटक केली होती. असा अंदाज आहे की प्लॅन A अपयशी ठरल्याने ही हत्या ‘प्लॅन B’ अंतर्गत करण्यात आली असावी.