Nanded crime | गोळीबाराच्या घटनेने नांदेड शहर हदरले, एकाचा मृत्यू (Firing)

नांदेड : Nanded crime |  गँगवारमधून (Gangwar) नांदेड शहरात एका तरुणाची निर्घृणपणे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. विक्की ठाकूर (Vicky Thakur) असे गोळीबारात (Firing) मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेने नांदेड शहर हदरुन गेले.

दोन दुचाकीवरून आलेल्या पाच जणांनी विक्की ठाकूरवर तीन गोळ्या (Firing) झाडल्या. (Three bullets were fired) यात जखमी झालेल्या विक्कीवर आरोपिंनी तलवारीने अनेक वार करून खून केला. ही घटना मंगळवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास नांदेड शहरातील गाडीपुरा भागात (In Gadipura area of ​​Nanded city) ही घटना घडली. मयत विक्की ठाकूरवर शहरातील विविध पोलीस ठाण्यात पाच गंभीर गुन्हे दाखल आहेत. विक्की हा काही दिवसांपूर्वीच जामिनावर बाहेर आला होता. (Gangwar)

 

एका वर्षापूर्वी विक्की चव्हाण नामक गुंडाची हत्या झाली होती. विक्की ठाकूर हा विक्की चव्हाण याचा मित्र होता. मंगळवारी रात्री विक्की गाडीपुरा भागात आपल्या घराजवळ थांबला होता. तेव्हा दोन दुचाकीवर आलेल्या पाच जणांनी त्याच्यावर गोळीबार केला. (Firing) नेम चुकल्याने विक्की धावत सुटला. आरोपींनी पाठलाग करत त्याला काही अंतरावर गाठून त्यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या. (Vicky Thakur was parked near her house in Gadipura area on Tuesday night.) आरोपींनी हवेत गोळीबार करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. (Gangwar)

 

 

 

या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी दाखल झाले. पंचनामा करून पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. कुख्यात गुंड कैलास बिगनीया याचा भाऊ नितीन बिगानीया, गंगाधर बोकारे यांच्यासह अन्य गुंडांनी विक्की ठाकूरची हत्या केली असावी, असा पोलिसांचा संशय आहे. (Firing)

 

Local ad 1