कँन्टोन्मेंट : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (Republican Party of India), भारतीय बौद्ध महासभा, करुणा महिला मंडळ, निर्वाण सामाजिक संस्था मंगळवार पेठ यांच्या संयुक्त विद्यमाने 66 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. (Shobha Yatra at Mangalwarpet on Dhamma Pravartana Day)
धम्मचक्र प्रवर्तन दिननिमित्ताने जुना बाजार, कुंभार वाडा, पवळे चौक, कमला नेहरू हॉस्पिटल, नरपतगिरी चौक या परिसरात भव्यदिव्य धम्म रथ शोभा यात्रा काढून समतेचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन रिपाइचे पश्चिम महाराष्ट्र युवक कार्याध्यक्ष निलेश आल्हाट (Nilesh Alhat) यांनी केले होते. (Shobha Yatra at Mangalwarpet on Dhamma Pravartana Day)
याप्रसंगी पुणे महापालकेचे माजी सभागृह नेते गणेश बीडकर, रिपाईचे जेष्ठ नेते असित गांगुर्डे, शहराध्यक्ष शैलेश चव्हाण, माजी नगरसेवक विवेक यादव, बसपा नेते सोनुभाऊ निकाळजे, माजी नगरसेवक रवींद्र धंगेकर, भारतीय बौद्ध महासभा वार्ड अध्यक्ष नितीन वाघमारे, महिला उपाध्यक्षा महानंदा डाळींबे, गोविंद साठे, रिना आल्हाट, प्रशांत म्हस्के, विलास कांबळे, प्रशांत वाघमारे सह आदी महिला भगिनी व बांधव उपस्थित होते.
यात्रेचा समारोप डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ सामुदायिक वंदना घेऊन व खिर दानाने करण्यात आला, असे आल्हाट यांनी सांगितले. (Shobha Yatra at Mangalwarpet on Dhamma Pravartana Day)