मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यापल रमेश बैस यांच्या भेटीला, राजकीय चर्चांना उधाण

मुंबई : राज्याच्या राजकारणात मोठे फेरबदल होतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राजीनाम्यामुळे राज्याचे राजकाण ढवळून निघाले असतानाच गुरुवारी अजून एक मोठी घडामोड घडत असल्याचे समोर आले आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेण्यासाठी राजभवनात गेले आहेत. त्यामुळे राज्यात मोठे फेरबदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Chief Minister Eknath Shinde met Rajyapal Ramesh Bais alone)

 

राज्यातील दहा IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणाला कोणती मिळाली जबाबदारी

  महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पडद्यामागे अनेक घडामोडी घडत आहेत. या घडामोडींदरम्यान एकनाथ शिंदे आणि राज्यपाल रमेश बैस यांची ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. या बैठकीत काहीतरी मोठा निर्णय होण्याची चर्चा आहे. राज्याच्या सत्तासंघर्षाचा सुप्रीम कोर्टातील निकाल आता कधीही जाहीर होऊ शकतो. या निकालाच्या पार्श्वभूमीवर पडद्यामागे घडामोडी घडत असतात. महाराष्ट्राच्या राजकारणात सातत्याने घडामोडी घडत आहेत. अशा परिस्थितीत अचानक मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्या भेटीची घटना घडत आहे. (Chief Minister Eknath Shinde met Rajyapal Ramesh Bais alone)

 

एकनाथ शिंदे आणि राज्यपाल रमेश बैस यांची ही पहिलीच भेट आहे. महाराष्ट्रात सत्तांतर झालं त्यावेळी भगतसिंह कोश्यारी हे राज्यपाल होते. पण नंतर त्यांनी केलेल्या विविध वक्तव्यांमुळे त्यांच्यावर टीका झाली. या दरम्यान राष्ट्रपतींकडून रमेश बैस यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली. (Chief Minister Eknath Shinde met Rajyapal Ramesh Bais alone)

Local ad 1