Transfers of Administrative Officers। प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी उरले शेवटचे तीन दिवस

Transfers of Administrative Officers । महसूल, गृह विभाग, कृषी सह शिक्षण विभागातील (Revenue, Home Department, Agriculture, Education Department) बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. जे अधिकारी बदलीस पात्र आहेत, अशा  प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या ह्या 31 मे पर्यंत पूर्ण करायच्या आहेत. त्यामुळे बदल्यांसाठी केवळ तीन दिवस उरले आहेत. त्यामुळे बदलीस पात्र असलेले आणि क्रिम पोस्टिंग मिळविण्यासाठी इच्छुक असलेले आणि बदलीसाठी पात्र असलेल्या  अधिकाऱ्यांचे लक्ष लागलेले आहे. (Last three days left for transfers of administrative officers)

 

Maharashtra SSC Result 2023 Live Updates । दहावीच्या निकालाविषयी महत्वाची बातमी

गृह विभागाने आयपीएस, पोलिस अधीक्षक,उप अधीक्षक, निरीक्षक, उपनिरीक्षकांच्या (IPS, Superintendent of Police, Deputy Superintendent, Inspector, Sub-Inspector) बदल्या केल्या आहेत. त्याबरोबरच महसूल विभागानेही काही प्रमाणात बदल्या केल्या आहेत. मात्र, ज्या अधिकाऱ्यांवर बदलीची टांगती तलवार आहे.

आम्हांला गुगल न्यूजवर फाॅलो करण्यासाठी क्लिक करा

 

 

प्रशासकीय बदल्या 31 मे पुर्वी करण्याच्या आहेत. त्यामुळे आज सोमवारी बदल्यांची मोठी यादी येण्याची शक्यता प्रशासकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त करण्यात आली. (Last three days left for transfers of administrative officers)

पुण्यात येण्यासाठी अनेकजण इच्छुक

प्रशासकीय अधिकाऱ्यांना मराठवाडा आणि विदर्भात बदली जाण्यास तिथे जाण्याची इच्छा नसते. प्रत्येकाला पुणे, मुबंई, पश्चिम महाराष्ट्रात (Pune, Mumbai, Western Maharashtra) पोस्टिंग हवी असते. त्यासाठी मंत्रालयात वशिला लावला जाते. त्यात काही वेळा सध्या कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांचा तीन वर्षाचा कालावधी झाला नसला तरी, त्याची बदली करुन आपल्या सोयीचा अधिकारी बसवला जातो.

Local ad 1