सिल्लोड तालुक्यातील लसीकरण पंधरा दिवसांत पूर्ण करण्याचा निर्धार

औरंगाबाद Aurangabad News : आपल्या लोकांच्या आरोग्याची काळजी घेणे आपली सामाजिक जबाबदारी असल्याने कोणीही लसीकरण पासून वंचित राहणार नाही, यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेतला पाहिजे, लसीकरणाची मोहीम सुरूच असणार असून येत्या 15 दिवसांत सिल्लोड मतदारसंघात 100 टक्के लसीकरण करण्याचा निर्धार राज्यमंत्री अब्दुल सत्तार (Minister of State for Revenue and Rural Development Abdul Sattar) यांनी केला. (Determination to complete vaccination in Sillod taluka within fortnight)

 

शहरातील नॅशनल हायस्कूलच्या प्रांगणात कोरोना लसीकरण अभियानाचा शुभारंभ महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते झाले.त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जानकी देवी बजाज ग्रामविकास संस्थेचे अध्यक्ष सी. पी. त्रिपाठी (Janaki Devi Bajaj Gram Vikas Sanstha President C. P. Tripathi) , नगराध्यक्षा राजश्री निकम, उपनगराध्यक्ष अब्दुल समीर, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण (Aurangabad Collector Sunil Chavan), जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे (Aurangabad Zilla Parishad Chief Executive Officer Nilesh Gatne) जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर शेळके, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर आदिंची प्रमुख उपस्थिती होती.

 

महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या संकल्प व सुचनेनुसार सिल्लोड व सोयगाव तालुक्यात आयोजित मोफत कोरोना लसीकरण अभियानास नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. सिल्लोड शहर व ग्रामीण भागात नागरिकांनी या अभियानात स्वयंस्फूर्तीने सहभागी होत लसीकरण करून घेतले. लसीकरण करते वेळी गर्दी होवू नये यासाठी प्रशासनाकडून नियोजनबद्ध उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. बजाज ग्रुपच्या सहकार्याने या अभियानासाठी कोरोना लस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. (Determination to complete vaccination in Sillod taluka within fortnight)

 

राज्यमंत्री अब्दुल सत्तार कोरोना लसीचे महत्व पटवून देत म्हणाले की, भविष्यातील धोका पाहता आजच लस घेणे आवश्यक आहे. कोरोना लस घेतलेली नसल्यास प्रवास करता येणार नाही तसेच लस न घेतलेल्यांना वैयक्तिक लाभाच्या योजनेपासून वंचित राहावे लागू शकते असे राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले. बजाज ग्रुपने सामाजिक बांधिलकी जपत आपला उद्योग व्यवसाय केला. कोरोनाच्या संकटात बजाज ग्रुपने कोरोना लसीचा पुरवठा करून दिल्याबद्दल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी बजाज ग्रुप चे आभार व्यक्त केले. (Determination to complete vaccination in Sillod taluka within fortnight)

 

 

लस पूर्णपणे सुरक्षित – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

लस घेतल्यानंतर कोरोनाच्या आजारातून लवकर बरे होता येते, लसीचे कवच कुंडल असेल तर कोरोना झाला तरी सुरक्षित यावर मात करू शकाल असे स्पष्ट करीत लसीकरण मोहिमेला उत्स्फूर्तपणे साथ देऊन नागरिकांनी लसीकरण करून घ्या असे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी याप्रसंगी केले. सिल्लोड आणि सोयगाव लसीकरणात मागे आहे नक्कीच ही गोष्ट भुषणावह नाही. त्यामुळे आता ह्या महालसीकरण मोहिमेमध्ये जनतेनी सहभाग नेांदवून आपल्या तालुक्यात 100 टक्के लसीकरण करुन घ्यावे. यावेळी जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या वयोवृद्ध आई वडिलांचे उदाहरण देऊन कोरोना लसीचे महत्त्व उपस्थितांना पटवून दिले. (Determination to complete vaccination in Sillod taluka within fortnight)

 

आणखी 80 हजार लस उपलब्ध करून देऊ

बजाज ग्रुप ने कायम सामाजिक बांधिलकी जपली, आपल्या लोकांसाठी काहीतरी करायचे यासाठी बजाज नेहमी प्रयत्नशील राहिले आहेत. लसीकरण कोरोना वर एकमेव उपाय असून लसीकरण झाल्यानंतर ही कदाचित कोरोना झाला असला तरी यापासून मृत्यू झाल्याचे अद्याप उदाहरण नाही अशा शब्दांत श्री. त्रिपाठी यांनी कोरोना लसीचे महत्त्व पटवून दिले. लस पूर्णपणे सुरक्षित आहे, कोणत्याही अफवांना बळी न पडता प्रत्येकाने लस घ्यावी असे आवाहन करीत लसीकरण मोहीमे साठी आणखी 80 हजार लस बजाज कडून उपलब्ध करून देऊ अशी ग्वाही जानकी देवी बजाज ग्रामविकास संस्थेचे अध्यक्ष सी. पी. त्रिपाठी यांनी यावेळी दिली.

Local ad 1