हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते पाटील निलंबित

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यातील हवेली तालुक्याच्या तहसीलदार तृप्ती कोलते पाटील (Tehsildar Trupti Kolte Patil of Haveli) यांच्याविरोधात तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्या तक्रारींच्या चौकशीत तीन मुद्यांवर ठपका ठेवण्यात आला असून, त्यानुसार त्यांना निलंबित करण्यात आली आहे. त्यामुळे महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे. (Controversial Tehsildar Trupti Kolte Patil of Haveli suspended)

हडपसर (Hadapsar) येथील वनजमीन तत्कालीन महसूल मंत्री चंद्रकांत पाटील (The then Revenue Minister Chandrakant Patil) यांच्या आदेशाची खातरजमा न करता संबंधित अर्जदाराला प्रदान केले होते. तसेच करोना महामारीत जीवनावश्यक वस्तुंची खरेदी आणि आवश्यक सेवासुविधा यांमध्ये वित्तीय अनियमितता केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. तसेच पुणे शहरच्या तहसीलदार (Pune City Tehsildar) असताना कोलते यांनी नियमबाह्य पद्धतीने कामकाज आणि निवडणूक विषयक कामकाजाबाबत गंभीर तक्रारींचा ठपका ठेवून तृप्ती कोलते पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. राज्य शासनाचे अवर सचिव संजीव राणे (Sanjeev Rane, Under Secretary to the State Govt) यांनी हे आदेश जारी केला आहे. (Controversial Tehsildar Trupti Kolte Patil of Haveli suspended)
विभागीय आयुक्त सौरभ राव (Divisional Commissioner Saurabh Rao) यांनी २ फेब्रुवारी रोजी सादर केलेल्या अहवालावरुन कोलते यांनी हडपसर येथील सर्वेक्षण क्रमांक ६२ या जमिनीबाबतच्या तत्कालीन महसूल मंत्री यांच्या आदेशाची खातरजमा न करता तसेच शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय जिल्हाधिकारी यांचे अभिप्राय, आदेश प्राप्त न करता कार्य कक्षेच्या बाहेर जाऊन संबंधित अर्जदारास राखीव वन संवर्गातील जमीन प्रदान केल्याचा आदेश १२ जुलै २०२१ रोजी दिला होता. तसेच विभागीय आयुक्त राव यांच्या २३ मे रोजीच्या अहवालात कोलते यांनी करोना काळात जीवनावश्यक वस्तुंची खरेदी करताना आणि आवश्यक सेवासुविधा प्राप्त करून घेताना उद्योग, उर्जा व कामगार विभागाच्या शासन निर्णयातील तरतुदींचा अवलंब न करता वित्तीय अनियमितता केल्याचे निदर्शनास आले.

 

तसेच पुणे शहरच्या तहसीलदार असताना प्रकाश बिजलानी (Prakash Bijlani) व इतर यांच्या प्रकरणात नियमबाह्य पद्धतीने कामकाज केले. याशिवाय कोलते यांच्याविरुद्ध निवडणूकविषयक कामकाजाबाबत गंभीर तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे कोलते यांना निलंबित करण्यात आल्याचे आदेशात नमूद केले आहे.  (Controversial Tehsildar Trupti Kolte Patil of Haveli suspended)
दरम्यान, हवेली तहसीलदार म्हणून किरण सुरवसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सुरवसे यांनी १२ डिसेंबरपर्यंत या पदाचा कार्यभार स्वीकारावा, असेही आदेशात देण्यात आले आहेत. (Controversial Tehsildar Trupti Kolte Patil of Haveli suspended)
Local ad 1