नांदेड जिल्ह्यात 181 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत सव्वातीन हजार उमेदवार रिंगणात

नांदेड : जिल्ह्यातील १८१ ग्रामपंचायतीसाठी उमेदवारांच्या अर्जांची छाणनी बुधवारी करण्यात आली. त्यात सरपंचपदासाठीचे पाच तर सदस्य पदासाठीचे ४९ अर्ज विविध कारणास्तव बाद ठरले आहेत. त्यामुळे आता उमेदवारी माघारीनंतर दोन्ही पदाचे तीन हजार 281 उमेदवार रिगणांत आहेत. (3 thousand 281 candidates are in the fray in the elections of 181 gram panchayats in Nanded district)

 

 

ग्रामपंचायतींच्या सदस्य व सरपंच पदांसाठी प्राप्त अर्जाची छाननी सोमवारी रात्री उशिरापर्यंत करण्यात आली. त्यानंतर बुधवारी उमेदवारी अर्ज दुपारी तीनपर्यंत मागे घेता आले. याच दिवशी दुपारी तीन विजेनंतर निवडणूक (Election) चिन्हांचेही वाटप करण्यात आले आहे. मतदान दि. १८ डिसेंबर रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत करता येणार असून, मतमोजणी दि. २० डिसेंबर रोजी होणार आहे. (3 thousand 281 candidates are in the fray in the elections of 181 gram panchayats in Nanded district)

 

सरपंचपदासह (Sarpanchap) ग्रामपंचायत सदस्यत्वासाठी दि. १८ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर बहुतांश ठिकाणी बहुरंगी लढती होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. माघार घेतल्यानंतर सरपंचाच्या १८१ पदांसाठी ४६१ तर सदस्यांच्या एक हजार ३९१ जागांसाठी दोन हजार ६२० उमेदवार रिंगणात आहेत. (3 thousand 281 candidates are in the fray in the elections of 181 gram panchayats in Nanded district)

Local ad 1