talathi bharti 2023 पुणे : महसूल विभागाअंतर्गत तलाठी (गट-क) संवर्गातील पदांच्या सरळसेवा भरतीच्या अनुषंगाने जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (महाराष्ट्र राज्य), नवीन प्रशासकीय इमारत दुसरा मजला, पुणे या ठिकाणी ‘तलाठी भरती कक्ष’ सुरु करण्यात आलेला आहे. (Talathi Recruitment Major Update; Establishment of ‘Talathi Recruitment Room’)
महाराष्ट्र शासन महसूल व वन विभागाने (Government of Maharashtra Revenue and Forest Department) राज्यातील तलाठी पदभरती राबविण्यासाठी राज्यस्तरीय नोडल अधिकारी म्हणून अप्पर जमाबंदी आयुक्त तथा अतिरिक्त संचालक भूमि अभिलेख पुणे यांची नेमणूक केली आहे. त्याअनुषंगाने कार्यालयाच्यावतीने ‘तलाठी भरती कक्ष’ सुरु करण्यात आलेला आहे. (talathi bharti 2023 | तलाठी भरतीची नवीन अपडेट)