निरंकारी मिशनच्यावतीने स्वच्छता अभियान 

पुणे :  निरंकारी सद्गुरू माता सुदीक्षा जी महाराज यांच्या पावन आशीर्वादाने रविवारी  (sunday) ‘स्वच्छता अभियान‘ रविण्यात आले. या स्वच्छता अभियानाचे नेतृत्व संत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन द्वारा करण्यात आले. (Swachhta Abhiyan on behalf of Nirankari Mission) 
  ससून रुग्णालय (Sassoon Hospital) आणि बी.जे. शासकीय मेडिकल कॉलेज (B.J. Government Medical College) परिसरामध्ये सकाळी ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत स्वछता अभियान राबविण्यात आले. ज्यामध्ये मिशनचे सर्व संयोजक, मुखी, सेवादल अधिकारी, सेवादल, संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनचे स्वयंसेवक आणि निरंकारी भक्त सहभागी झाले होते. (Swachhta Abhiyan on behalf of Nirankari Mission)
  संत निरंकारी मिशन सन २०१५ पासून ‘स्वच्छ भारत अभियानाचे’ एक अभिन्न अंग राहिले असून, मिशनला भारत सरकारने ‘स्वच्छ भारत अभियानाचे ब्रँड अम्बॅसेडर;  म्हणून घोषित करण्यात आले आहे. (Swachhta Abhiyan on behalf of Nirankari Mission)
  स्वच्छता अभियानात ससून चे मुख्य अधिष्ठाता डॉ. विनायक काळे,  डॉ. विजय जाधव (उपअधिक्षक ससून ), डॉ. सोमनाथ खेडेकर आदी सहभागी झाले होते.  (Swachhta Abhiyan on behalf of Nirankari Mission)

 

 निरंकारी मिशनच्या माध्यमातून वेळोवेळा स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, रक्तदान शिबीर याव्यतिरिक्त अनेक सामाजिक उपक्रम सुंदर पद्धतीने राबविले जातात. कोरोनाच्या विषम परिस्थितीमध्ये मिशनद्वारा ‘कोविड केअर सेंटर’ आणि लसीकरण शिबीराचे देखील आयोजन करण्यात आले. या सर्व लोककल्याणाच्या सेवेचा आधार सद्गुरूंची अपार कृपा आणि दिव्य मार्गदर्शन राहिले आहे.

 

 

      पुणे झोनचे प्रभारी ताराचंद करमचंदानी यांनी उपस्थित मान्यवरांचे तसेच ससून रुग्णालय प्रशासनाचे आभार व्यक्त केले
Local ad 1