साॅफ्टवेअर इंजिनिअर होण्याची इच्छा व्यक्त करणाऱ्या सुर्वेशला मिळाले बळ ; कॉग्रेस राष्ट्रीय अध्यक्षांनी दिला संगणक

नांदेड : भारत जोडो यात्रेत (Bharat Jodo Yatra) राहुल गांधी (Rahul Gandhi) अनेक घटकांशी भेटून संवाद साधत आहेत. यादरम्यानच एका विद्यार्थ्याची झालेल्या संवादातून त्याला सॉफ्टवेअर इंजिनियर (Software Engineer)
होण्याची इच्छा आहे. परंतु त्याने आजपर्यंत संगणक (computer) पाहिला नसल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आली. त्यांनी या प्रसंगाचा उल्लेख जाहीर सभेत करत केंद्र शासनाच्या शैक्षणिक धोरणावर (Education Policy of Central Govt) जोरदार हल्ला चढवला होता.

 

सुर्वेशला संगणक भेट देतात

 

राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वात निघालेल्या भारत जोडो यात्रेत प्रत्येक भेटणाऱ्या व्यक्ती, विद्यार्थी, व्यापारी, नोकरदार वर्ग यांना येणाऱ्या येणाऱ्या अडचणी आणि त्यावरील उपाय यावर राहुल गांधी चर्चा करत आहेत. गुरुवारी यात्रा नांदेड शहरात पोहोचली. देगलूर ते नांदेड निघालेल्या पदयात्रेत विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला. (Survesh, who expressed his desire to become a software engineer, got a computer)

 


यावेळी “तू काय करतोस, तुला काय व्हायचं आहे”?, असा प्रश्न राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी सुर्वेश (Survesh) हतने या विद्यार्थ्याला विचारला. त्यावर सुर्वेशने क्षणाचाही विलंब न करता मला सॉफ्टवेअर इंजिनिअर व्हायचं आहे, अशी इच्छा बोलून दाखवली. त्यानंतर राहुल गांधी यांनी सुर्वेशला (Survesh) प्रतिप्रश्न करत तू कधी संगणक पाहिला आहेस का? तुझ्या शाळेत संगणक आहे का?, असे विचारले त्यावर सुर्वेशने नाही असे उत्तर दिले.

 

https://m.facebook.com/story.php?story_fbid=pfbid0f45FeJY46z9nSoKipq3MjwPWxkig1X83CThyxDEUYYMuEBRbzkhyXabvDksDf3H1l&id=100083183873213

 

या घटनेचा उल्लेख करत राहुल गांधी यांनी जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या शैक्षणिक धोरणावर जोरदार हल्ला चढवला. राहुल गांधी केवळ टिका करत नाहीत, तर सकारात्मक पाऊल उचलत आहेत, हे आजच्या घटनेवरून समोर आले, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. (Survesh, who expressed his desire to become a software engineer, got a computer)

 

काँग्रेसचे नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सुर्वेशला राहुल गांधी यांच्या हस्ते संगणक संच भेट दिला. राहुल गांधी यांच्या हस्ते संगणक संगणक स्वीकारताना  सुर्वेशच्या (Survesh) चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता. यामुळे आता सुर्वेशच्या इच्छेला बळ मिळाले आहे. यावेळी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उपस्थितीत होते. (Survesh, who expressed his desire to become a software engineer, got a computer)

Local ad 1