पुणे : राज्य राखीव पोलीस बल गट क्र.५, दौंड (State Reserve Police Force Group No.5, Daund) या गटाच्या आस्थापनेवरील सशस्त्र पोलीस शिपाई भरतीच्या लेखी परीक्षेकरीता (Armed Police Constable Recruitment Written Exam) प्रवर्गनिहाय निवड झालेल्या उमेदवारांची यादी https://www.maharashtrasrpf. gov.in संकेतस्थळावर २७ जानेवारी २०२३ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. (State Reserve Police Force Armed Police Recruitment: List of Eligible Candidates Released)
रिक्त असलेल्या ७१ पदांकरीता मैदानी चाचणीत उमेदवारांना मिळालेल्या गुणाच्याआधारे १:१० या प्रमाणात ही यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. उमेदवारांना याबाबत काही हरकती किंवा आक्षेप असल्यास कार्यालयाच्या srpfgr5@rediffmail.com ई-मेल आयडीवर लेखी स्वरुपात किंवा समादेशक कार्यालयातील नियंत्रण कक्ष येथे प्रत्यक्षरित्या हजर राहून ३१ जानेवारी २०२३ रोजी ५ वाजेपर्यंत सादर करावेत. मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या कोणत्या हरकती किंवा आक्षेप विचारात घेतले जाणार नाहीत याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. (State Reserve Police Force Armed Police Recruitment: List of Eligible Candidates Released)
अधिक माहितीसाठी कार्यालयाच्या ०२११७-२६२३४७ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, अशी माहिती राज्य राखीव पोलीस बल गट क्र. ५ दौंडच्या समादेशक विनीता साहू यांनी दिली आहे. (State Reserve Police Force Armed Police Recruitment: List of Eligible Candidates Released)