अहंकाराचा त्याग करुन निरंकाराला हृदयामध्ये वसवावे : माता सुदीक्षा महाराज

पुणे : “अहंकाराचा त्याग करुन निरंकार प्रभूला हृदयामध्ये वसवून खरेखुरे मानवी जीवन जगावे” असे प्रतिपादन निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षा महाराज यांनी केले. औरंगाबादच्या बिडकीन डीएमआयसी विभागात पारपडलेल्या महाराष्ट्राच्या 56 व्या वार्षिक निरंकारी संत समागमाच्या दुसऱ्या दिवशी देश-विदेशातून लाखोंच्या संख्येने आलेल्या विशाल मानव परिवाराला संबोधित करताना व्यक्त केले. (One should renounce ego and establish nirankara in the heart: Mata Sudiksha Maharaj)

 

अहंकारामुळे मनुष्य स्वत:ला श्रेष्ठ मानत असतो आणि मनामध्ये भौतिक वस्तूंना ईश्वरा पेक्षा अधिक मौल्यवान मानत असतो. परिणामी तो जीवनाच्या वास्तविकतेपासून अनभिज्ञ राहतो आणि खरेखुरे मानवी जीवन जगू शकत नाही. याउलट जर मानवाने ब्रह्मज्ञानाच्या माध्यमातून ईश्वराशी नाते जोडले आणि सदोदित ईश्वराची जाणीव ठेवली तर त्याचे जीवन मौल्यवान होऊन जाते. (One should renounce ego and establish nirankara in the heart: Mata Sudiksha Maharaj)

 

​सद्गुरु माताजींनी पुढे सांगितले, की ज्याप्रमाणे एक थेंब जेव्हा सागराला मिळतो तेव्हा त्याला सागराची उपमा मिळते. तद्वत मनुष्य जेव्हा भ्रामक ‘मी’चे अस्तित्व सोडून देतो आणि ईश्वररूपी शाश्वत ‘तू’च्या प्रति समर्पित होतो तेव्हा त्याला ईश्वरस्वरूप झाल्याचा श्रेष्ठ दर्जा प्राप्त होतो. (One should renounce ego and establish nirankara in the heart: Mata Sudiksha Maharaj)

​शेवटी, सद्गुरु माताजींनी समजावले, की ज्याप्रमाणे साबण आणि पाणी यांची सोबत केल्याने मळलेले कपडे स्वच्छ होतात तद्वत परम पावन परमात्म्याशी नाते जोडून त्याच्याशी अभिन्नता प्राप्त केल्याने आपण अंतर्बाह्य निर्मळ होऊन जातो, ज्यायोगे आपल्या जीवनात सहजपणे आत्मिकता आणि मानवता यांचा संगम होतो. (One should renounce ego and establish nirankara in the heart: Mata Sudiksha Maharaj)

मुख्यमंत्री यांची सदिच्छा भेट

​महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी रविवारी संत समागमाला सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी संत निरंकारी मिशनच्या कार्याचा गौरव करताना शिंदे म्हणाले, संत-महात्मा सदोदित मानवाच्या जीवनात शांतीसुखाची प्राप्ती व्हावी आणि त्यांचे कल्याण व्हावे यासाठी सतत प्रयत्नशील असतात. आज हे निरंकारी मिशन सुद्धा विश्वबंधुत्वाचे हेच उदात्त कार्य करत आहे.  मिशनकडून कोरोनादरम्यान सुद्धा कौतुकास्पद कार्य केले असून, नैसर्गिक आपत्ती असो किंवा स्वच्छता अभियानासारखे सामाजिक उपक्रमात  मिशन आपले योगदान देत आहे. याप्रसंगी औरंगाबादचे पालकमंत्री संदीपान भुमरे आणि मंत्री अब्दुल सत्तार उपस्थित होते.
Local ad 1