Shikshak Bharti 2023 । जिल्हा बदली हवी असल्यास शिक्षकांना द्यावा लागेल राजीनामा !

शिक्षक भरतीचे संपूर्ण नियम व अटी जाणून घ्या

Shikshak Bharti 2023 । पुणे : राज्यातील रिक्त असलेल्या शिक्षकांच्या जागा जिल्हा परिषदांमर्फत भरल्या जाणार आहेत. (Shikshak Bharti 2023) या भरती संदर्भात राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने (Department of School Education) नव्याने नियम व अटी लागू केल्या आहेत. यामध्ये नव्याने नियुक्त होणाऱ्या शिक्षकांची मोठी अडचण होणार असल्याचे दिसून येत आहे. (Teachers have to resign if they want district transfer)

 

 

शिक्षक भरतीचे संपूर्ण नियम व अटी जाणून घेण्यासाठी क्लिक करा

 

 

राज्यात प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेमधील शिक्षकांची एकूण ६५,१११ पदे रिक्त असून त्यापैकी ३०,००० शिक्षकांची पदे भरण्यात येणार, (Shikshak Bharti 2023) अशी माहिती शालेय शिक्षण मंत्र्यांनी विधानसेभत उपस्थित लक्षवेधी आणि तारांकित प्रश्नांना उत्तर देताना सांगितले होते. त्यानुसार प्रशासकीय पातळीवर भरतीची तयारी सुरु करण्यात आली आहे. शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी २०१७ मधील गुणवत्तेच्या आधारे शिक्षक भरती करण्यात आली. (Shikshak Bharti 2023) त्यामुळे अनेकांची नियुक्ती आपल्या जिल्ह्यात झालेली नाही. त्यामुळे हे शिक्षक जिल्हा बदलीसाठी शिक्षण प्रयत्न करत आहेत. परिमाणी राज्यातील काही जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षकांची संख्या कमी होत आहे.

Shikshak Bharti 2023

 

आगामी काळात राज्यात रिक्त असणाऱ्या तब्बल 30 हजार शिक्षकांच्या जागा जिल्हा परिषदे अंतर्गत भरल्या जाणार आहेत. त्यासाठी राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने नव्याने नियम व अटी लागू केल्या आहेत. त्यात ज्या जिल्ह्यात शिक्षकाची नियुक्ती झाली आहे. त्याच जिल्ह्यात संपूर्ण सेवा पुर्ण करावी लागणार आहे.

 

 

नव्याने नियुक्त होणाऱ्या शिक्षकांना अंतर जिल्हा बदली मिळणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. ज्यांना दुसऱ्या जिल्ह्यात बदली हवी असल्यास त्यांना थेट राजीनाम देऊन पुन्हा भरती प्रक्रियेतून जावे लागणार आहे. नव्याने नियुक्ती झाल्यानंतर या शिक्षकांस जिल्हा बदलीचा हक्क राहणार नाही. तथापि, नव्याने नियुक्तीनंतर इतर जिल्ह्यांत जाऊ इच्छिणाऱ्या शिक्षकांने रितसर राजीनामा देऊन पुन्हा विहीत प्रक्रीयेच्या माध्यमातून आवश्यकतेनुसार शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी परीक्षा देऊन त्यातील गुणवत्तेच्या आधारे पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक म्हणून नियुक्ती मिळविणे आवश्यक राहील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे नव्याने नियुक्त होणाऱ्या शिक्षकांची बदलीसाठी कोंडी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

 

Local ad 1