डॉ. अनिल रामोड प्रकरणात विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी केला मोठा खुलासा

मुंबई : पुणे विभागाचे महसूल अतिरिक्त आयुक्त डॉ. अनिल रामोड प्रकरणात विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे (Ambadas Danve, Leader of the Opposition in the Legislative Council) यांनी मोठा खुलासा केला आहे. एक पत्र ट्वीट करून व्वा रे वा विखे पाटील असे लिहिले आहे. (Revenue Minister Radhakrishna Vikhe Patil had recommended to Chief Minister Eknath Shinde not to transfer Anil Ramod)


सोलापूर जिल्ह्यातील जागेच्या भूसंपादनाच्या बदल्यात जास्त रकमेचा मोबादला मिळवून देण्यासाठी आठ लाख रुपयांची लाच घेतल्या प्रकरणात अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ. अनिल रामोड न्यायालयीन कोठडीत आहेत.
अनिल रामोड यांची पुणे विभागातून बदली करू नये, यासाठी भाजप नेते आणि राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (State Revenue Minister Radhakrishna Vikhe Patil) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांना शिफारस पत्र लिहिले होते. हे पत्र ट्वीट करत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विखे पाटलांवर जोरदार निशाणा साधला आहे.

 

 

व्वा रे व्वा विखे पाटील !

पुणे येथे आयएएस अधिकारी डॉ. अनिल रामोड हा आठ लाख रुपये लाच घेतल्यामुळे सीबीआयने अटक केल्यावर सध्या कारागृहात आहे. परंतु या प्रकरणात महसूलमंत्री राधाकृष्ण विखेंचे नाव समोर आले आहे. या मंत्र्याने रामोड याची बदली पुण्यावरुन करू नये, यासाठी शिफारस पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिले होते. महसूल अधिकारी अनिल रामोड याला पुण्यात एक वर्ष मुदतवाढ देण्यात यावी, यासाठी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी शिफारस केली होती. त्यांनी चक्क मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यांना पत्र लिहिले होते. १ जून रोजी विखे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले होते, रामोड हे पुण्यातील विभागीय आयुक्त कार्यालयात अतिरिक्त आयुक्तपदी होते. त्याला याच पदावर मुदत वाढ मिळावी, असे पत्र विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले होते,’ असा दावा करत दानवे यांनी विखे पाटलांवर हल्लाबोल केला आहे.

Local ad 1