डाॅ. रामोड यांच्या अडचणीत होणार वाढ? ; वढू येथील वर्ग-२ च्या जमीन प्रकरणात आता सीबीआयची एन्ट्री

सीबीआयने तहसीलदार यांच्याकडून माहिती मागविली

पुणे : पुणे विभागाचे अतिरिक्त विभागीय आयुक्तांवर केंद्रीय अन्वेशन विभागाने (Central Investment Department CBI) छापा टाकून टाकला. (The Additional Divisional Commissioner was raided by the Central Bureau of Investigation (CBI).) त्यानंतर प्रकरणे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. वढू येथील सुमारे 19 एकर जमीन प्रकरणाची चौकशी सुरु आहे. त्यात डाॅ. अनिल रामोड (Dr. Anil Ramod) यांनी दिलेल्या आदेश आणि त्यासंबंधी फाईल्स सीबीआयने शिरूर तहसीलदार (Shirur Tehsildar) यांना मागितल्याची माहिती सुत्रांनी दिली. त्यामुळे आता डाॅ. रामोड यांच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली. (CBI entry now in Class-II land case at Vadhu Budruk; Dr. Ramod’s problem will increase?)

 
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (National Highway Authority) भूसंपादनातील शेतकऱ्यांच्या लवादाचे प्रकरणांवर विभागीय अतिरिक्त आयुक्त डाॅ. अनिल रामोड यांच्याकडे सुनावण्या होत होत्या. भूसंपादनाच्या वाढीव मोबदल्याच्या एकूण रक्कमेपैकी 10 टक्के रक्कम लाच म्हणून मागणी केली. तडजोडीनंतर आठ लाख रुपयांची लाच स्वीकारताना अतिरीक्त विभागीय आयुक्त डाॅ. रामोड यांना सीबीआयने कार्यालयीन दालनातच रंगेहात पकडले. त्यानंतर विविध ठिकाणी टाकलेल्या छापा सत्रातून सुमारे पावणे सात कोटींची रोकड मिळाली आहे. तर स्थावर मालमत्ता वेगळ्या आहेत. (CBI entry now in Class-II land case at Vadhu Budruk; Dr. Ramod’s problem will increase?)

 

 

दरम्यान, तीन दिवसांच्या कोठडीनंतर न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी (Judicial Custody) सुनावली आहे. सीबीआयने तपासाच्या अनुषंगाने अतिरिक्त आयुक्तांनी भूसंपादनाचे आतापर्यंत दिलेल्या निकालांबाबत चौकशी सुरू केली आहे. सीबीआयकला वढू बुद्रूक येथील देवस्थान जमिनीचे प्रकरणाची माहिती देण्यात आली. त्यावर सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणात देखील चौकशी सुरू केल्याची माहिती सुत्रांनी दिली. त्या अनुषंगाने सीबीआयने शिरूरच्या तहसीलदारांना पत्र पाठवून संबंधित जमिनीच्या फाईल्सची माहिती मागविल्याची माहिती सूत्रांनी दिली. (CBI entry now in Class-II land case at Vadhu Budruk; Dr. Ramod’s problem will increase?)

 

 

वढू बुद्रूक येथील काय आहे प्रकरण ?

वढू बुद्रूक (Vadhu Budruk) येथील वक्फ मंडळाची १९ एकर जागा (वर्ग २) देवस्थानची ईनामी जमीन १८६२ ची सनद असताना विभागीय अतिरीक्त आयुक्त डाॅ. रामोड यांनी खासगी लोकांच्या नावे करून दिल्याचा आरोप करत निकालाची कागदपत्रे वक्फ बोर्डाने जाहीर केली आहेत. विशेष म्हणजे हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना विभागीय आयुक्तांनी पदाचा गैरवापर करत थेट सातरा उताऱ्यावर खासगी लोकांची नावे टाकण्याचे आदेश दिले असून, जमिनीचा व्यवहार करण्यात आल्याचा आरोप वक्फ बोर्डाने करून, या प्रकरणात डाॅ. रामोड यांच्यासह 19 जणांना कारणे दाखवा नोटीस वक्फ बोर्डाने बजावली आहे. यासंदर्भात खुलासा करण्यासाठी चार आठवड्याची मुदत दिली होती. परंतु ही मुदत संपण्यापूर्वीच डाॅ. रामोड लाच घेताना सीबीआयच्या जाळ्यात अडकले.

Local ad 1