पुणे पावसाळी पर्यटनासाठी (Rainy season tourism) चांगला पर्याय ; पण आता थोडं थांबा.!
पुणे ः पावसाळी पर्यटनासाठी पुणे जिल्ह्यात चांगले पर्याय आहेत. तुम्ही यापुर्वी आला असाल. आता पुन्हा येण्याचा विचार करत असाल तर थोडं थांबा. (Pune is a great option for rainy season tourism, but wait a minute!) कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे पावसाळी पर्यटनाला बंदी आहे. (Rainy season tourism is banned) त्यामुळे पर्यटनस्थळापर्यंत तुम्हांला जाता येणार नाही. जर जाण्याचा कोणी प्रयत्न केल्यास त्यांना पोलिसांच्या दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागत आहे. (Pune rural police)
गेल्या रविवारी सिंगहगडावर पर्यटकांची झालेली गर्दी आणि त्यामध्ये झालेले कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन या पार्श्वभूमीवर हवेली पोलिसांकडून या आठवड्यात नियम मोडून येणाऱ्या पर्यटकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. शनिवार व रविवार या दोन दिवसांत ७७ जणांवर दंडात्मक कारवाई करत त्यांच्याकडून तब्बल ८८ हजार पाचशे रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. (Pune is a great option for rainy season tourism, but wait a minute!
पुणे जिल्ह्याचा ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे पावसाळी पर्यटनासाठी होणारी गर्दी कमी करा, वेळप्रसंगी कठोर कारवाई करा, अशा सक्त सूचना उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. The prevalence of corona is increasing in rural areas of Pune district. Therefore, the crowd for monsoon tourism should be reduced and strict action should be taken, such strong instructions have been given to the administration by Deputy Chief Minister and Guardian Minister Ajit Pawar.