पत्नीला घटस्फोट दिला तरच तु आमदार, मंत्री होशील ; राजकीय गुरुला (Political guru) पोलिसांनी केली अटक
पुणे : तुझी बायको पांढर्या पाय गुणांची आहे. तीची जन्मवेळ चुकीची असून, तिचे ग्रहमान दुषीत झाले आहेत. जर तुझी ही बायको म्हणु अशी कायम राहीली तर तु आमदार व मंत्री होणार नाहीस, (Only if you divorce your wife will you become an MLA, a minister; Police arrested a political guru who gave such advice) असा सल्ला देणाऱ्या राजकीय गुरु चतुःशृंगी पोलिसांनी (Chaturshringi police) बेड्या ठोकल्या आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
रघुनाथ राजराम येंमुल (Raghunath Rajram Yenmul) (48, रा. धवलगिरी अपार्टमेंट, आयवरी इस्टेट, बाणेर) असे अटक करण्यात आलेल्या गुरूचे नाव आहे. याप्रकरणात फिर्यादी महिलेचा पती गणेश नानासाहेब गायकवाड (वय 36) (Ganesh Nanasaheb Gaikwad) यांच्यासह सासरच्या आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सात जणांना अटकपूर्व जामीन झाला असून पती गणेश आणि राजु अंकुश हे फरार झाले आहेत. याबाबत 27 वर्षीय पीडित विवाहितेने फिर्याद दिली (The 27-year-old victim filed a complaint) आहे. ही घटना 23 जानेवारी 2017 पासून गुन्हा दाखल होईपर्यंतच्या कालावधीत घडल्याचे फिर्याैदीत नमूद करण्यात आले आहे.
येमुल यांने पती गणेश गायकवाड यांला “तुझी पत्नी अवदसा असुन पांढर्या पाय गुणांची आहे. तीची जन्मवेळ चुकीची आहे, त्यामुळे ग्रहमान दुषीत झाले आहेत. जर तुझी ही बायको म्हणु अशी कायम राहीली तर तु आमदार होणार नाही व मंत्री होणार नाहीस, त्यामुळै तिला लवकरात लवकर सोडचिठ्ठी दे आणि तुझा मुलगा तिच्या काढुन घे, मी देतो ते लिंबु उतरविल्यावर तुझ्या मागची पिडी कायमची निघुन जाईल”, त्यानंतर पती गणेश यांनी फिर्यादीवरून लिंबू ओवाळून टाकल्याचा प्रकार केला. संसार मोडण्यासाठी अनिष्ठ रूढी परंपरा अघोरी कृत्याचा वापर झाल्याचे फिर्यादीने जबाबत नमूद केल्यानंतर ल्यानंतर येमुल गुरूजींना बेड्या ठोकल्या आहेत. (Only if you divorce your wife will you become an MLA, a minister; Police arrested a political guru who gave such advice)