पुणे बंद : पुणे बंदला स्फुर्त प्रतिसाद

Pune : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari), मंत्री चंद्रकांत पाटील (Minister Chandrakant Patil), आमदार प्रसाद लाड (MLA Prasad Lad) तसेच इतर भाजप नेत्यांनी (BJP leaders) केल्लया वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांविरोधात निषेध म्हणून सामाजिक संघटना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना यांनी पुणे बंद पुकारला आहे. या बंदमध्ये व्यापारी संघटना, आडत व्यापाऱ्यांनी बंदला पाठिंबा दिला आहे या बंदसाठी उदयनराजे भोसले, संभाजीराजे छत्रपती, सुषमा अंधारे, सुप्रिया सुळे आणि इतरही अनेक नेत्यांना आमंत्रित करण्यात आलं आहे. डेक्कन येथून निघालेला मोर्चाचे लाल महालाजवळ जाऊन सभेत रुपांतर होणार आहे.

 

Spontaneous response to Pune Bandh 1
Spontaneous response to Pune Bandh 1

 

राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, संभाजी ब्रिगेड, मराठा क्रांती मोर्चा आणि ठाकरे गट देखील या बंदमध्ये सहभागी होणार आहे. त्या सोबतच पुण्यातील व्यापारी संघटना आणि गणेशोत्सव मंडळांनीदेखील पाठिंबा दिला आहे. डेक्कन जिमखाना येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मूक मोर्चास प्रारंभ होणार आहे. डेक्कन जिमखाना, अलका चित्रपटगृह चौक, मार्गे लक्ष्मी रस्त्याने बेलबाग चौकातून लालमहाल येथे मुकमोर्चाची सांगता जाहीर सभेने होणार आहे. (Pune Bandh: Spontaneous response to Pune Bandh)
Spontaneous response to Pune Bandh 2
Spontaneous response to Pune Bandh 2

 

यात कोणताही उचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी सुमारे साडे सात हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे. पुणे पोलिसांनी सुमारे 100 वरिष्ठ अधिकारी, 1000 हून अधिक पोलीस कर्मचारी तैनात केले आहेत. (Pune Bandh: Spontaneous response to Pune Bandh)

कोण आहे बंदमध्ये सहभागी

मार्केट यार्ड बंद राहणार असल्याने भाजीपाला आणि फुलांचे मार्केट बंद राहणार आहे. विविध व्यापारी संघटनांनी पाठिंबा दिल्याने लक्ष्मी रस्त्यासह शहरातील सर्व दुकाने तीन वाजेपर्यंत बंद राहणार आहेत. गणेशोत्सव मंडळांनी पाठिंबा दिल्याने प्रमुख गणेश मंदिरे बंद राहणार आहेत.शाळांना बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आलय. मात्र जबरदस्ती करण्यात येणार नाही.
  • पी एम पी एम एल ही सार्वजनिक वाहतूक बस सेवा बंद राहणार आहे. रिक्षा संघटनांनी पाठिंबा दिल्याने रिक्षा बंद राहणार आहेत.हॉटेल्स बंद राहणार आहेत. (Pune Bandh: Spontaneous response to Pune Bandh)
Local ad 1