खळबळजनक : शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी

NCP Chief Sharad Pawar Gets Death Threat : राष्ट्रवादी काँग्रेसचे (National Congress Party) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना जीवे मारण्याची धमकी आल्याची माहिती समोर येत आहे. मुंबईतील (Mumbai News) सिल्व्हर ओक (Silver Oak) येथील घरी अज्ञात व्यक्तीने फोन करुन धमकी दिल्याची माहिती मिळत आहे. (NCP Chief Sharad Pawar Gets Death Threat) गावदेवी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

 

पोलीस आयुक्तांना दिलेली पत्र
पोलीस आयुक्तांना दिलेली पत्र

 

शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक येथील घरी अज्ञात व्यक्तीने फोन करून पवार यांना जीवे मारण्याची धमकी दिली. देशी बनावटीचे पिस्तुल घेऊन ठार मारणार असल्याचे सांगितले आहे. (NCP Chief Sharad Pawar Gets Death Threat )

 

 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फोन करणाऱ्या अज्ञात व्यक्तीने हिंदीत धमकी दिली. बंगल्यावर तैनात असलेल्या पोलीस ऑपरेटरच्या तक्रारीवरून गावदेवी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (NCP Chief Sharad Pawar Gets Death Threat)

Local ad 1