Big breaking news। वीज कर्मचाऱ्यांना संपावर जाण्यास मनाई, मेस्मा कायदा लागू

मुंबई : राज्यातील शासकीय वीज कंपन्यांमध्ये कार्यरत अभियंते, तंत्रज्ञ, कर्मचारी आणि कंत्राटी कर्मचारी व कामगार यांनी आज रविवारी रात्री १२ वाजतापासून दोन दिवसीय (२८ आणि २९ मार्च) संपावर जाण्याचा इशारा दिल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने वीज कंपन्यांच्या अधिकारी-कर्मचारी या सर्वांना महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परिरक्षा अर्थात मेस्मा कायदा (Maharashtra Essential Services Protection (MESMA) Act) लागू केला  केला आहे. (Power workers banned from going on strike, Mesma law enforced)

 

 

मला दिल्लीत पाठविण्यामध्ये अब्दुल सत्तारांची महत्वाची भूमिका : खासदार इम्तियाज जलील

 

 महानिर्मिती, महावितरण आणि महापारेषण (Mahanirmithi, Mahavitaran and Mahapareshan) या शासनाच्या वीज कंपन्यांच्या अधिकारी-कर्मचारी (Officers-employees of power companies) यांच्या सेवा या अत्यावश्यक सेवा असून या अधिकारी- कर्मचाऱ्यांसाठी महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परिरक्षा अधिनियम अर्थात *मेस्मा* लागू करून त्यांना संपावर जाण्यास प्रतिबंध करण्यात येत असल्याचे राज्य शासनाने आज राजपत्रात प्रसिद्ध आदेशात म्हटले आहे. (Power workers banned from going on strike, Mesma law enforced)

 

ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत (Energy Minister Dr. Nitin Raut) यांनी यापूर्वीच राज्यातील वीज कंपन्यांचे कोणत्याही परिस्थितीत खासगीकरण होणार नाही,अशी ठाम भूमिका वेळोवेळी घेतली आहे. याशिवाय केंद्र सरकारच्या वीज क्षेत्राच्या खासगीकरणाच्या प्रयत्नांनाही राज्याच्या ऊर्जा विभागाने, राज्य सरकारने तीव्र विरोध केला आहे. उन्हाळ्यातील वाढलेले तापमान,१० आणि १२ वीच्या परीक्षा,विविध पीकांना पाण्याची असलेली गरज या पार्श्वभूमीवर राज्यातील जनतेला अखंड वीज पूरवठा मिळावा म्हणून वीज कंपन्यांच्या अधिकारी- कर्मचारी यांनी संपावर जाऊ नये असे आवाहनही यानिमित्ताने राज्य शासनाने केले आहे. (Power workers banned from going on strike, Mesma law enforced)

Local ad 1