तंबाखू विकत असाल तर होऊ शकते कारवाई ; धर्माबाद शहरात 17 ठिकाणी धाडसत्र

नांदेड : तंबाखू सर्वत्र खुलेआमपणे विक्री केली जाते. मात्र, त्यावर आता प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला असून, तंबाखू विक्रेत्यांमध्ये एकच खळबळ उडाले आहे. (Action against tobacco sellers in Dharmabad city)

धर्माबाद शहरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची मोठ्या प्रमाणात विक्री तसेच कोटपा 2003 कायद्याचे उल्लंघन होत असल्याची माहिती मिळताच जिल्हास्तरीय तंबाखू नियंत्रण पथकाने (District Level Tobacco Control Team) धर्माबाद शहरात (Dharmabad city) अचानक धाड टाकून 17 तंबाखू विक्रेत्यांवर कारवाई केली. या कार्यवाहीत तंबाखू विक्रेत्यांना 18 हजार 300 रुपयाचा दंड आकारला. (Action against tobacco sellers in Dharmabad city)

 

ही कार्यवाही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नीलकंठ भोसीकर (District Surgeon Dr. Neelkanth Bhosikar) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकात जिल्हा सल्लागार डॉ. साईप्रसाद शिंदे, कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. उमेश मुंडे, मानसशास्त्रज्ञ प्रकाश आहेर, सामाजिक कार्यकर्ता बालाजी गायकवाड तसेच ग्रामीण रुग्णालय धर्माबाद येथील वैद्यकीय अधीक्षक वेणुगोपाल पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली नितीन आडे तसेच स्थानिक पोलीस निरीक्षक संजय हिबारे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना.जयराम चुकेवाड व पी.सी. एस.आर.घोसले आदी होते. (Action against tobacco sellers in Dharmabad city)
सार्वजनिक ठिकाणी तसेच शैक्षणिक अथवा शासकीय, निमशासकीय कार्यालयाच्या परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची विक्री अथवा सेवन किंवा साठवण होत असल्यास जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष, जिल्हा रुग्णालयात तक्रार नोंदवून नांदेड जिल्हा तंबाखू मुक्त करण्याच्या या अभियानास सहकार्य करावे असे, आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे. (Action against tobacco sellers in Dharmabad city)
Local ad 1