पुणे : राज्यातील शिक्षक पदांची भरती प्रक्रियेची कार्यवाही पवित्र प्रणालीमार्फत सुरु करण्यात आली आहे. सद्यस्थितीत 196 व्यवस्थापनांतील सुमारे 769 पदांसाठी एसईबीसी आरक्षणाच्या जागा इडब्लूएस/खुल्या प्रवर्गात रुपांतरीत करुन पदभरतीची कार्यवाही पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांनी 17 जुलै 2022 पर्यंत आपले प्रमाणपत्र अद्ययावत करावेत, असे शिक्षण उपसंचालक डॉ. श्रीराम पानझाडे यांनी कळविले आहे. (pavitra portal latest news : teacher recruitment begins)
पवित्र प्रणालीअंतर्गत शिक्षक भरतीसाठी 2 सप्टेंबर 2021 रोजी 561 खाजगी व्यवस्थापनाच्या 2 हजार 62 रिक्त पदांसाठी मुलाखतीसह पर्यायांतर्गत 3 हजार 902 पात्र उमेदवारांची शिफारस करण्यात आली होती. प्रमाणपत्र अद्ययावत केल्यानंतर उमेदवारांकडून उपलब्ध रोस्टर व विषय विचारात घेऊन त्याच्या शैक्षणिक व व्यावसायिक पात्रतेनुसार प्राधान्यक्रम उपलब्ध करुन देण्यात येईल. (pavitra portal latest news : teacher recruitment begins)
एकूण 196 व्यवस्थापनाच्या सुमारे 769 रिक्त पदांसाठी 1:10 या मर्यादेत उमेदवार उपलब्ध करुन दिले जातील. मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी एकूण 30 गुण असतील. उमेदवारांची अंतिम निवड 30 गुणांच्या आधारे आरक्षण व विषय विचारात घेऊन केली जाईल.(pavitra portal latest news : teacher recruitment begins)