Nanded latest news । अवैध दारू विक्रेत्याकडून लाच घेणारा पोलीस जमादार अकडकला सापळ्यात

Nanded Crime News । नांदेड  : बिलोली तालुक्यातील रामतीर्थ पोलीस ठाण्यात (At Ramtirtha Police Station) कर्तव्यावर असलेला पोलीस हेड कॉन्स्टेबलने होमगार्डमार्फत पाच हजारांची लाच स्वीकारली. (Latest News Nanded)  ही कारवाई बिलोली तालुक्यातील खातगाव फाटा येथे मंगळवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली. या कारवाईमुळे एकाच खळबळ उडाली आहे. (Police arrested for taking bribe from illegal liquor dealer)

 

या प्रकरणी लक्ष्मण मारोती पाटील (वय 55 वर्ष  दत्तनगर नायगाव जि. नांदेड)  आणि होमगार्ड  कपिल लक्ष्मण भालेराव, (वय 28 वर्ष,  रा. अटकळी ता. बिलोली जि. नांदेड) या घोघांना अटक केली आहे.  (Latest News Nanded)

तक्रारदार रामतीर्थ  पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदा दारूविक्री करतात. याठिकाणी आरोपी पाटील याने भालेरावला सोबत घेऊन छापा टाकला.  (Latest News Nanded)यावेळी कारवाई टाळण्यासाठी पाटील याने होमगार्ड भालेराव याच्या मार्फत पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. मात्र, तक्रारदार यांना लाच द्यायची इच्छा नव्हती. त्यामुळे त्यांनी थेट नांदेड लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय गाठून सोमवारी तक्रार दिली. या तक्रारीची मंगळवारी शहानिशा  करुन खतगाव फाटा येथे ट्रॅप लावण्यात आला. त्यात भालेराव अलगतपणे अडकला.(Police arrested for taking bribe from illegal liquor dealer)

 

 

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक कल्पना बारवकर, उपअधीक्षक धरमसिंग चव्हाण, राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक दत्ता केंद्रे, अरविंद हिंगोले, पोना किशन चिंतोरे, एकनाथ गंगातिर्थ, जगन्नाथ अनंतवार,सचिन गायकवाड यांनी केली. (Police arrested for taking bribe from illegal liquor dealer)

Local ad 1