...

निवडणुका ‘स्वतःच्या ताकदीवर’ की महायुतीच्या माध्यमातून ?

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार उद्या जाहिर करणार भूमिका

पुणे, राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक अवघे चार महिने उरले आहेत. सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली असून, निवडणुका स्वतंत्रपणे लढायच्या की महायुतीच्या माध्यमातून, यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज भूमिका स्पष्ट करणार आहेत. (ncp chief ajit pawar election decision announcement)

 

PLFS 2023-24 महाराष्ट्रच्या रिपोर्टने उघड केलं धक्कादायक वास्तव !

 

अजित पवार म्हणाले, “पक्षाचे कार्यकर्ते आपापल्यापरीने तयारीला लागले आहेत. वर्धापन दिन कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस महायुती मध्ये  निवडणूक लढायची की स्वतंत्रपणे, यावर आपली भूमिका मांडणार आहे.” पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, “महायुतीतील काही सहकारी एकत्र लढण्याचे, तर काही स्वतंत्र लढण्याचे मत मांडतात. पण अंतिम निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल.” दोन राष्ट्रवादी गट एकत्र येणार का, या प्रश्नावर पवार म्हणाले, “प्रश्न विचारण्याचा अधिकार तुमचा आहे, पण उत्तर देण्याचा अधिकार माझा आहे.” यावर त्यांनी अधिक भाष्य टाळलं.

 

UIDAI चं mAadhaar अ‍ॅप वापरून मोबाईल नंबर व्हेरिफाय करा – आता अगदी सोपं !

 

मुंबईतील वाहतुकीचे तातडीने ऑडिट करणे गरजेचे

मुंबई लोकल अपघाताबाबत अजित पवार यांची प्रतिक्रिया मुंबईतील मुंब्रा-दिवा स्थानकदरम्यान दोन लोकल जवळ आल्याने झालेल्या अपघातात ८ प्रवाशांचा मृत्यू झाला. यावर शोक व्यक्त करताना पवार म्हणाले की, “रेल्वे मंत्रालयाने मुंबईतील वाहतुकीचे तातडीने ऑडिट करणे गरजेचे आहे. लोकलला दरवाजे नसल्यामुळे लटकलेले प्रवासी घासले जातात.” (ncp chief ajit pawar election decision announcement)

“मीही एकेकाळी लोकलने प्रवास केला आहे. त्यामुळे मला माहिती आहे की प्रवासी चालत्या लोकलमध्ये चढतात-उतरतात. ही जबाबदारी रेल्वे मंत्रालयाची आहे आणि याबाबत चौकशी झाली पाहिजे.” राज ठाकरे यांच्या या विषयावरच्या वक्तव्यावर, पवार म्हणाले, “राजकीय व्यक्तींना काय बोलायचं हे त्यांचा अधिकार आहे.”

Local ad 1