सामनाच्या अग्रलेखातून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासह भाजपवर हल्लाबोल

मुंबई : मंगळवारी दिवसभर केंद्रीय मंत्री नारायण राणे (Union minister narayan rane) यांच्यावर गुन्हे दाखल होत, त्यांची अटक आणि जामिन या दरम्यान, राज्यभरात हायहोल्टेज ड्राम पाहालया मिळाला. हे सगळ झाल्यानंतर आजच्या दैनिक सामनाची हेंडिग आणि अग्रलेखात काय असणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. (Samana newspaper editorial) नारायण राणे यांच्यासह भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवर  सामनातून हल्लाबोल करण्यात आला आहे. 

काय आहे अग्रलेखात..

“नको त्या माणसाला सत्तेची दारु पाजल्याने कोणत्या प्रसंगांना सामोरे जावे लागते त्याचा अनुभव भाजप सध्या घेत आहे. महाराष्ट्राची सत्ता हातून निसटल्यापासून भाजपवाल्यांची डोकी कामातून गेली आहेत. केंद्रीय मंत्रिपदाची झूल पांघरूनही मूळ स्वभाव काही जाईना. आता भाजप नक्की काय करणार? की या वेळीही बगला वर करुन नामानिराळे राहणार?, असा सवाल संजय राऊत (dainik saamana executive editor sanjay raut) यांनी केला आहे.

 

सामानाचा अग्रलेख वाचण्यासाठी येथे करा क्लिक  (Samana newspaper editorial)

 

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांविषयी ही भाषा वापरणे म्हणजे 105 हुतात्म्यांच्या भावनांना लाथ मारण्यासारखेच आहे. राणे यांनी महाराष्ट्राला लाथ मारली व त्यांचे नवे नेते देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटील राणेंच्या बेताल वक्तव्याचे समर्थन करीत आहेत. राणे यांना तसे बोलायचे नव्हते, अशी मखलाशी करु लागले आहेत. फडणवीस-पाटील यांच्या गळ्यात राणे नावाचा फाटका फुगा अडकला आहे. त्यामुळे सांगता येत नाही, सहनही होत नाही, अशी त्यांची अवस्था झाल्याचे अग्रलेखात नमुद करण्यात आले आहे. (Samana newspaper editorial)

 

मुख्यमंत्रीपद ही व्यक्ती नसून घटना व संसदीय लोकशाहीचे कवच असलेली संस्था आहे. तुम्ही व्यक्तीवर टीका करा. तुमच्या भुंकण्याकडे कोणी ढुंकूनही पाहणार नाही, पण राज्याचे नेतृत्व करणाऱ्या नेत्यावर शारीरिक हल्ला करण्याची भाषा करणारा माणूस महाराष्ट्राच्या मातीत निपजावा याची वेदना सगळ्यांना आहे. अशा उपटसुंभांना भारतीय जनता पक्षाने ‘मांडीवर’ घ्यावे हे त्यांच्या संस्काराचे अधःपतन आहे ! शरद पवार यांच्यासारख्या लोकमान्य नेत्यांवर खालच्या भाषेत टीका करणारे लोकही भाजपने उधारीवर घेतले आहेत व हे लोक पवारांवरही ऊठसूट हल्ले करीत आहेत. एका माकडाच्या हाती दारूची बाटली होतीच. आता दुसरे माकडही बाटली घेऊन उड्या मारीत आहे. (Samana newspaper editorial)

 

 

केंद्रीय मंत्रिपदाची झूल पांघरूनही मूळ स्वभाव काही जाईना. आता भाजप नक्की काय करणार? की या वेळीही बगला वर करुन नामानिराळे राहणार? महाराष्ट्राची सत्ता हातून निसटल्यापासून भाजपवाल्यांची डोकी कामातून गेली आहेत. त्यांचे आकांडतांडव सुरूच आहे. त्या आकांडतांडवाकडे जनता लक्ष देत नसल्यामुळे ‘महात्मा’ नारोबांसारखे भाडोत्री लोक शिवसेनेवर सोडले जात आहेत. या भाडोत्रींनी भाजपलाच नागडे करून सोडले व आता तोंड लपवून फिरण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. (Samana newspaper editorial)

 

Local ad 1