...

नांदेडमध्ये अतिवृष्टी बाधित शेतक-यांच्या बँक खात्यात सोमवारी प्रति गुंठा 85 रुपये जमा होणार

नांदेड, २० सप्टेंबर २०२५ : नांदेड जिल्हा अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तीमुळे राज्यात पहिला असा जिल्हा ठरला आहे, अशी टिमकी सत्ताधारी वाजवून घेत आहेत. मात्र, शेतकऱ्यांना जिरायती पिकासाठी प्रतिगुठा ८५ रुपये, बागायती पिकासाठी प्रति गुठा १७० रुपये तर फळ पिकांसाठी २२५ प्रतिगुंठा मदत दिली जाणार आहे. प्रशासनाकडून करण्यात आलेल्या दाद्यानुसार जिथे पीक नुकसानग्रस्त शेतक-यांना १०० टक्के मदत निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीच्या तिसऱ्या टप्यात ५५३ कोटी ४८ लाख ६२ हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सोमवारपासून थेट जमा केले जाणार आहेत. खरडून गेलेल्या व गाळयुक्त जमिनींसाठी अतिरिक्त २०.८१ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या निधीमुळे ऑगस्ट महिन्यातील अतिवृष्टीत नुकसान झालेले पीक पूर्णपणे भरून निघणार आहे.

 

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी काँग्रेसची रणनीती स्पष्ट ; काय म्हणाले हर्षवर्धन सपकाळ

 

कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी अर्धापूर तालुक्यातील पिंपळगाव येथे भेट देऊन नुकसानग्रस्त शेतक-यांची पाहणी केली. त्यांनी शेतक-यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि शासनाच्या मदतीबाबत विश्वास दिला. नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत ६,४८,५३३.२ हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाले असून ७,७४,३१३ शेतक-यां प्रभावित झाले आहेत. जिल्ह्यातील खरीप हंगामातील जवळपास ८६ टक्के पीक क्षेत्र अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे बाधित झाले आहे.

 

Devendra Fadnavis। देवेंद्र फडणवीस यांना दिवसा पडतायेत पंतप्रधानपदाची स्वप्ने ; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची टीका

 

 

प्रभावित पिके व निधी वितरण
अतिवृष्टीमुळे मुख्यत्वे जिरायती पिके, बागायती पिके, फळ पिके, सोयबीन, कापूस, तूर, मुग, उडीद, ज्वारी, भाजीपाला, हळद आणि केळी यांचे नुकसान झाले. जिरायती पिके: ₹8,500 प्रति हेक्टर, बागायती पिके: ₹17,000 प्रति हेक्टर आणि फळ पिके: ₹22,500 प्रति हेक्टर मदत बँकेत जमा केली जाणार आहे. पहिल्या टप्यात जून-जुलै महिन्यातील नुकसानग्रस्तांसाठी ७३ कोटी ५४ लाख ३ हजार रुपये मंजूर करण्यात आले होते. दुसऱ्या टप्यात नांदेडसाठी मंजूर निधी ५५३ कोटी ४८ लाख ६२ हजार रुपये आहे.

Local ad 1