ग्रामसेवक, तलाठी आणि खातेप्रमुखांनो मुख्यालयी थांबा..!

कंधार kandhar haivey rainfall : नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे (Nanded district heavy rainfall) नदी-नाल्यांना पूर आला आहे. त्यामुळे जिवित व वित्त हनी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. संकटात सापडलेल्या नागरिकांना आवश्यक ती मदत वेळेत पोहोचविण्यासाठी सर्व ग्रामसेवक, तलाठी. सर्व मंडळ अधिकारी (Gramsevak, talathi and mandal adhikari) आणि इतर सर्व विभागाच्या खातेप्रमुखांनी मुख्यालयी थांबावे, (Headquarters) असे आदेश कंधार तहसीलदारांनी जारी केले आहेत. यंसदर्भात जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर (Nanded district collector dr vipin itankar) यांनी तहसीलदार यांना सूचना केल्या आहेत.  

 

कंधार तालुक्यात सोमवारपासुन मुसळधार पाऊस चालू असून, त्यामूळे नदी, नाले दुधडी भरून वाहत आहेत. सततच्या पावसामुळे वित्त व जिवीत हानी होण्याची शक्यता नाकरता येत नाही. सर्व कार्यालय प्रमुखांनी आपले मूख्यालयी उपस्थित रहावे. सक्षम अधिकारी यांचे पूर्व परवानगी शिवाय मुख्यालय सोडू नये तसेच, आपले अधिनस्त कर्मचारी यांनाही त्यांचे संबंधित गावात अतिवृष्टी बाबत गावांमध्ये सर्तकतेचा इशारा देणे सूचना द्याव्यात. जिवीत व वित्त हानी झाल्यास या कार्यालयातील नैसर्गिक आपत्ती शाखेस माहिती द्यावी. सदरील कामात हयगय किंवा निष्काळजीपणा केल्यास नैसर्गिक आपत्ती अधिनियम 2005 च्या विविध कलमान्वये कार्यवाही करण्यात येईल, असा इशारा तहसीलदार यांनी दिला आहे. (Nanded district heavy rainfall)

 

Local ad 1