Nanded ACB Trap । गुंठेवारीची फाईल मंजूरीसाठी लाच घेणार महापालिकेचा लिपिक अटक

Nanded ACB Trap। नांदेड : गुंठेवारी प्रस्ताव मंजुरी वरून ईडीच्या रडारावर असलेल्या नांदेड महापालिकेतील लिपाकाला गुंठेवारीची फाईल मंजूर करण्यासाठी 5 हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक (ACB) पथकाने अटक केली आहे.

Nanded ACB Trap । नांदेड : गुंठेवारी प्रस्ताव मंजुरी वरून ईडीच्या रडारावर असलेल्या नांदेड महापालिकेतील लिपाकाला गुंठेवारीची फाईल मंजूर करण्यासाठी 5 हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक (ACB) विभागाने अटक केली. त्यामुळे महापालिका प्रशासनात (Municipal Administration) एकच खळबळ उडाली आहे. (Municipal clerk arrested for taking bribe to approve Gunthewari’s file)

 

 

गजानन रामकिशन सर्जे (Gajanan Ramkishan Serge) (वय 33 वर्षे, लिपिक नांदेड वाघाळा) असे अटक केलेल्या लिपिकाचे नाव आहे.

 

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार यांनी त्यांच्या मालकीचा प्लॉट क्र 04 गट नंबर 99 तरोडा खु. नांदेड येथील मालमत्तेचे नियमाधीन गुंठेवारी करुन घेण्यासाठी दोन वर्षा पूर्वी नोव्हेंबर 2021 मध्ये अर्ज केला होता. परंतु त्यांचे अर्जावर कार्यवाही होत नसल्याने तक्रारदार यांनी लिपिक सर्जेला गुंठेवारी फाईल लवकर मंजूर करून द्यावी, अशी विनंती केली. त्यावर 5 हजार रुपये द्यावे लागतील, असे सांगितले.

 

तक्रारदार यांना लाच द्यायची इच्छा नसल्याने त्यांनी 8 जून रोजी एसीबीकडे तक्रार केली. 13 जून रोजी तक्रारीची एसीबीच्या पथकाने पडताळणी केली. त्यानंतर सापळा लावण्यात आला. त्यात लिपिक सर्जे याने तक्रारदार यांच्याकडून पाच हजार रुपयांची लाच स्विकारली. यावेळी एसीबीच्या पथकाने त्याला अटक केली. आरोपीला ताब्यात घेतले असून, वजिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरु आहे.

 

 

ही कारवाई अँटी करप्शन ब्युरो, नांदेड परिक्षेत्राचे अधीक्षक डॉ. राजकुमार शिंदे, पर्यवेक्षण अधिकारी पोलीस उप अधीक्षक राजेंद्र पाटील (Superintendent of Anti-Corruption Bureau, Nanded Region Dr. Rajkumar Shinde, Supervising Officer Deputy Superintendent of Police Rajendra Patil) यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक नानासाहेब कदम यांच्या पथकाने ही कारवाई केली. या पथकात विनयकुमार नकुलवार, सय्यद खदीर, चापोना मामूलवार यांचा समावेश होता.

Local ad 1