नांदेडच्या निवासी उप जिल्हाधिकरीपदी महेश वडदकर यांची नियुक्ती

राज्यातील महसूल विभागातील उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश सोमवारी उशिरा जारी करण्यात आले आहेत.

नांदेड : राज्यातील महसूल विभागातील उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश सोमवारी उशिरा जारी करण्यात आले आहेत. या विनंती बदल्या असून, त्यात परभणीचे निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांची नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी (Resident Deputy Collector) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. (Appointment of Mahesh Vadakar as RDC of Nanded)  त्याबरोबरच मराठवाड्यातील अकरा उप जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. (Orders of transfers of officers in the cadre of Deputy Collectors in the Revenue Department)

 

 

कोणाची कोठुन कुठे झाली बदली

१) श्रीमती आहिल्या गाठाळ ( उपविभागीय अधिकारी कळंब उस्मानाबाद ते उपजिल्हाधिकारी (रोहयो) लातूर. (Ahilya Gathal (Sub-Divisional Officer Kalamb Osmanabad to Deputy Collector (Rohyo) Latur)

२) ब्रिजेश पाटील (उपविभागीय अधिकारी हदगाव नांदेड ते वन जमिन अधिकारी , औरंगाबाद) (Brijesh Patil (Sub Divisional Officer Hadgaon Nanded to Forest Land Officer, Aurangabad)

३) दयानंद प्रकाश जगताप (उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन बीड ते उपविभागीय अधिकारी भोकरदन) (Dayanand Prakash Jagtap (Deputy Collector General Administration Beed to Sub Divisional Officer Bhokardan)

४) सुशांत शिंदे ( उपजिल्हाधिकारी पुनर्वसन परभणी ते उप विभागीय अधिकारी लातूर) Sushant Shinde (Deputy Collector Rehabilitation Parbhani to Sub Divisional Officer Latur)

५) अविनाश कोरडे (उप जिल्हाधिकारी (सामान्य) उस्मानाबाद ते उपविभागीय अधिकारी औसा-रेणापूर,लातूर) (Avinash Korde (Deputy Collector (General) Osmanabad to Sub Divisional Officer Ausa-Renapur, Latur

६) अरुण जऱ्हाड (उपजिल्हाधिकारी (रोहयो) परभणी ते उपविभागीय अधिकारी वैजापूर, औरंगाबाद (Arun Jarhad (Deputy Magistrate (Rohyo) Parbhani to Sub Divisional Officer Vaijapur, Aurangabad)

७) दिलीप कच्छवे (उपजिल्हा निवडणूक अधिकारी, हिंगोली ते निवासी उपजिल्हाधिकारी (Resident Deputy Collector) हिंगोली.

८) महेश वडदकर (निवासी उपजिल्हाधिकारी परभरणी ते निवासी उपजिल्हाधिकारी नांदेड.

९) शिरीष यादव (उप जिल्हा निवडणूक अधिकारी, बीड ते उप जिल्हा निवडणूक अधिकारी, उस्मानाबाद.

१०) रोहिणी नऱ्हे (उप विभागीय अधिकारी, भूम-परांडा, उस्मानाबाद ते उपविभागीय अधिकारी, लातूर.

११) अरूणा संगेवार (उपविभागीय अधिकारी, सेलू भरभणी ते उपविभागीय अधिकारी हदगाव,  नांदेड.

Local ad 1