मुंबई : राज्यातील अनुसूचित जातीतील इयत्ता 10 वी च्या परीक्षेत 90% किंवा त्यापेक्षा अधिक गुण प्राप्त केलेल्या आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना व्यावसायिक उच्च शिक्षणाची पूर्वतयारी करण्यासाठी 11 वी व 12 वी या दोन वर्षात प्रत्येकी 1 लाख रु. याप्रमाणे एकूण दोन लाख रुपयांचे “भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर (Dr.Babasaheb Ambedkar) विशेष अनुदान योजना” राबविण्यात येत आहे. (Scheduled Caste students will get financial assistance for higher education)
ही योजना MH-CET, NEET, JEE, मेडिकल, इ. सारख्या परीक्षेच्या पूर्व तयारीसाठी अनुसूचित जातीतील गुणवंत तसेच आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी असून ज्या विद्यार्थ्यांचे पालक दारिद्र्यरेषेखालील किंवा ज्यांचे वार्षिक उत्पन्न रक्कम 2,50,000/-(अक्षरी दोन लाख पन्नास हजार रुपये) पेक्षा कमी आहे व मुख्यत: लाभ हा त्याच विद्यार्थ्यांसाठी असेल ज्यांचे पालक असंघटित क्षेत्रात, कंत्राटी पद्धतीने कामे करतात. (Scheduled Caste students will get financial assistance for higher education)