महात्मा जोतिराव फुले (Mahatma Jyotirao Phule) शेतकरी कर्ज मुक्तीसाठी “हे” करा ; जिल्हाधिकाऱ्यांनी केले आवाहन
नांदेड : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजनेंतर्गत (Mahatma Jyotirao Phule Shetkari Karj Mukti Yojana) पात्र शेतकऱ्यांपैकी अजूनही 6 हजार 480 शेतकऱ्यांनी (Farmers) आपले आधार प्रमाणिकरण (Aadhar card number bank account link) करुन घेतले नाहीत. त्यामुळे त्यांच्या नावानर कर्ज असल्या ने नवीन कर्ज मिळण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरण करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले. (Nanded collector dr vipin itankar)
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजनेबाबत जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीसाठी जिल्हा उपनिबंधक अनिल चव्हाण व जिल्ह्यातील सर्व संबंधित बँक अधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली 25 जून रोजी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजनेविषयी बैठक झाली. त्यात पात्र असलेल्या आणि आधार लिंक केलेल्या 15 हजार 98 शेतकऱ्यांचे नाव पोर्टलवर प्रसिद्ध झाले नाही. त्यामुळे त्यांना पिककर्ज मि्ळत नाही. यासदंर्भात चव्हाण यांनी सहकार विभागाचे प्रधान सचिव यांना पत्र पाठवले आहे. (Mahatma Jyotirao Phule Karj Mukti Yojana (mjpsky)
महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजना
कर्ज माफी योजनेची कार्यपद्धत
आपला आधार क्रमांक बँकेच्या, विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या कर्जखात्याशी संलग्न करावा. आपला आधार क्रमांक बँकेच्या, विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या कर्जखात्याशी संलग्न करावा. मार्च २०२० पासून बँकांनी आधार क्रमांकासह आणि कर्ज खात्याच्या रकमेसह तयार केलेल्या याद्या सूचनाफलक तसेच चावडीवर प्रसिद्ध केल्या जातील. या याद्यांमध्ये शेतकऱ्याच्या कर्जखात्याला विशिष्ट ओळख क्रमांक दिलेला असेल. शेतकऱ्यांनी आधार कार्डासोबत आपल्याला दिलेला विशिष्ट ओळख क्रमांक घेवून ‘आपले सरकार सेवा’ केंद्रात जावून आपल्या आधार क्रमांकाची आणि कर्ज रकमेची पडताळणी करावी. पडताळणी नंतर शेतकऱ्यांना कर्ज रक्कम मान्य असल्यास नियमानुसार कर्जमुक्तीची रक्कम कर्जखात्यात जमा होईल. कर्ज रकमेबाबत व आधार क्रमांकाबाबत शेतकऱ्यांचे वेगळे म्हणणे असल्यास ते जिल्हाधिकाऱ्यांच्या समितीसमोर मांडले जाईल. समिती त्याबाबत निर्णय घेऊन अंतिम कार्यवाही करेल. (Mahatma Jyotirao Phule Karj Mukti Yojana (mjpsky)