खुशखबर..! प्रत्येकाला मिळणार पाच लखांपर्यंतचे उपचार मोफत ; मंत्रीमंडळाचा निर्णय

मुंबई : राज्यातील महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना (Mahatma Jyotirao Phule Jan Arogya Yojana) आणि केंद्राची आयुष्यमान भारत (ayushman bharat yojana) – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (Pradhan Mantri Jan Arogya Yojana) यांचे एकत्रीकरण करून, यात नागरिकांना आरोग्य संरक्षण ५ लाख रुपये एवढे करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. (The decision was taken in a cabinet meeting) त्यामुळे आता राज्यातील सर्व नागरिकांना पाच लाखांपर्यंत उपचार मोफत मिळणार आहेत.

 

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांच्या अध्यक्षस्थानी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सध्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेत दिड लाखांपर्यंत उपचाराची खर्च मर्यादा आहे. सुमारे २ कोटी कार्डसचे वाटप करण्यात येणार असून, रुग्णालयांची संख्या देखील वाढवण्यात येणार आहे.

 

असे होतील बदल

या जन आरोग्य योजनेत सध्या मुत्रपिंड (kidney) शस्त्रकियेसाठी असलेली अडीच लाख रुपयांची उपचार खर्चाची मर्यादा वाढवून ती साडे चार लाख रुपये एवढी करण्यात आली आहे. महात्मा फुले योजनेत ९९६ तर प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत १२०९ उपचार आहेत. यापैकी मागणी नसलेले १८१ उपचार वगळण्यात येतील. तर ३२८ नवीन उपचारांचा समावेश करण्यात येईल. प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत देखील एकूण उपचार संख्येत १४७ वाढ होऊन, ती आता १३५६ एवढी होईल. हे जादाचे उपचार महात्मा जोतिराव फुले योजनेत देखील समाविष्ट होतील. त्यामुळे या योजनेत उपचार संख्या ३६० ने वाढेल.

 

 

या दोन्हीही आरोग्य योजनांमधील रुग्णालयांची संख्या एक हजार इतकी आहे. महात्मा फुले जन आरोग्य योजना याआधीच महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागात लागू करण्यात आली असून, महाराष्ट्रातील १४० व कर्नाटकातील सीमेलगतच्या चार जिल्हयातील १० अतिरिक्त रुग्णालये अंगीकृत करण्याचा निर्णय झाला आहे. याशिवाय आणखी दोनशे रुग्णालये देखील अंगीकृत करण्यात येतील.

 

 

स्व. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray)रस्ते अपघात विमा योजनेचा समावेश देखील महात्मा फुले जन आरोग्य योजनेत करण्यात येईल. त्याचप्रमाणे यासाठी असलेली ३० हजार रुपयांच्या उपचारांची खर्चाची मर्यादा वाढवून प्रतिरुग्ण प्रति अपघात एक लाख रुपये अशी करण्यात येईल. या योजनेत महाराष्ट्र सीमा भागातील रस्ते अपघातात झालेले जखमी झालेले महाराष्ट्र राज्या बाहेरील किंवा देशा बाहेरील रुग्णांचा देखील समावेश करण्यात येईल.

Local ad 1