पुणे : राज्यातील सुमारे अकरा जिल्ह्यात आज आणि उद्या (30, 31 मार्च) दोन दिवस अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आहे. तर विविध भागात ढगाळ वातावरण राहणार आहे. (maharashtra weather Chance of unseasonal rain in some parts of the state)
Related Posts
मुंबईसह कोकणातील चार जिल्हे, विदर्भातील बुलढाणा ते गोंदिया, वाशिम ते गडचिरोली अशा 11 जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी आज आणि उद्या पावसाची शक्यता आहे. तसेच मध्य महाराष्ट्रातील खान्देश, नाशिक, कोल्हापूर सांगली आणि सोलापूरपर्यंत अशा 11 जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे. तर काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता आहे. (maharashtra weather Chance of unseasonal rain in some parts of the state)
दरम्यान, 31 मार्चनंतर विदर्भात दोन दिवस म्हणजे 2 एप्रिलपर्यंत वातावरणाची तीव्रता जाणवू शकते. दरम्यान, मराठवाड्यातील आठ जिल्ह्यात स्वच्छ कोरडे वातावरण असण्याची शक्यता आहे. ( maharashtra weatherChance of unseasonal rain in some parts of the state)