Yellow alert news । पाऊस नांदेडकरांची पाठ सोडेना ; पुन्हा यलो आलर्ट जारी

Yellow alert news  । नांदेड : यंदाच्या पावसाने सुरुवातीला उघडीप दिल्याने पिकांच्या उत्पादनात 50 टक्क्यांपेक्षा अधिक घट झाली. त्यानंतर वेळोवेळी झालेल्या अतिवृष्टीमुळे उर्वरित 50 टक्के उत्पादनही वाया गेले. तर दुसरीकडे वित्त व जिवित हनीही झाली.

 

आता पाऊस परतला, असे वाटत असतानाच पुन्हा एकदा पुढचे चार दिवस अतिवृष्टी होईल, (Yellow alert issued again)  असा इशारा हवामान विभागाने  दिला आहे. त्यामुळे यंदा पाऊस नांदेडकरांची पाठ सोडत नसल्याचे दिसून येत आहे. (Four days of heavy rains again in Nanded district) 

 

 

मुंबई प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्राने दिलेल्या सूचनेनुसार दिनांक 6 ते 9 ऑक्टोंबर दरम्यान नांदेड जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी (Yellow alert issued again)  केला आहे. त्यानुसार 6 ते 9 ऑक्टोंबर ह्या दरम्यान जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारे, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. खबरदारीची उपाययोजना म्हणून नागरीकांनी  काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. (Four days of heavy rains again in Nanded district) 

 

 

विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा. आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका. आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा. तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहा. पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा, असे आवाहन करण्यात आले आहे.  (Four days of heavy rains again in Nanded district) 

 

Local ad 1