IPL 2024 KKR ने आठ गडी राखुन हैद्राबादचा केला पराभव

 आयपीएलच्या अंतिम सामन्यात कोलकत्ता नाईट रायडर्स ने हैदराबाद सनराईजरचा आठ गडी राखून अकराव्या षटकातच जिंकला आहे. (IPL 2024 KKR wins by eight wickets) कोलकात्ता संघाने तिसऱ्यांदा चषकावर नाव कोरले आहे. सलामीवीर सुनील नारायण दोन चेडूंत 6 धावा करुन परतला. दुसरा सलामीवर Rahmanullah Gurbaz ने चांगली फलंदाजी केली. त्याने व्येकंटेश अय्यर सोबत गुरुबाजने 32 चेंडूत 39 धावा केल्या आहेत. परंतु तो फटका मारण्याच्या प्रयत्नात झेल बाद झाला. नारयाण बाद झाल्यानंतर व्येकंटेश अय्यर फलंदाजीसाठी आला. त्यांने जोरदार फटके मारत नाबाद 26 चेंडूत 52 धावा केल्या. त्याला Rahmanullah Gurbaz ने चांगली  साथ दिली.

 

 

कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएलच्या 17 व्या मोसमातील अंतिम सामन्यात सनरायजर्स हैदराबादवर 8 विकेट्सने विजय मिळवला आहे. केकेआर या विजयासह आयपीएल 2024 ची चॅम्पियन ठरली आहे. केकेआरने 10 वर्षानंतर पुन्हा एकदा अंतिम सामन्यात विजय मिळवला. केकेआरने याआधी 2012 साली चेन्नईतील चेपॉकमध्ये विजय मिळवला होता. केकेआरची यंदाची आयपीएल ट्रॉफी जिंकण्याची ही तिसरी वेळ ठरली. केकेआरच्या गोलंदाजांनी आधी हैदराबादला 18.3 ओव्हरमध्ये 113 धावांवर गुंडाळलं. त्यानंतर केकेआरने 2 विकेट्स गमावून 10.3 ओव्हरमध्ये 114 धावांचं आव्हान पूर्ण केलं. केकेआरकडून वेंकटेश अय्यर याने सर्वाधिक नाबाद 52 धावांची खेळी केली. रहमानुल्लाह गुरुबाज याने 39 धावांचं योगदान दिलं. तर सुनील नारायन आणि कॅप्टन श्रेयस अय्यर या दोघांनी 6 धावा केल्या.

 

Local ad 1