भारताची विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात धडक

मुंबई : भारताने न्यूझीलंडचा 70 धावांनी पराभव करत विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात धडक मारली आहे. भारतीकडून मोहम्मद शम्मीने 7 बळी घेतले. तर फलंदाजीमध्ये विराट कोहली आणि श्रेयश अयर याने केलेल्या शतकाच्या जोरावर हा विजयी मिळवत. विश्वचषकाच्या अंतिम सामन्यत धडक मारली. (India enters the final of the World Cup)

 

आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडवर 70 धावांनी विजय मिळवत भारतीय क्रिकेट संघाने  वर्ल्ड कप फायनलमध्ये धडक मारली आहे. भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार रोहित शर्माने सुरुवातीपासून तडाखेबाज फलंदाजी केली. त्यानंतर विराट कोहली आणि श्रेयश आय्यरच्या शतकाच्या जोरावर भारताने न्यूझीलंडला विजयासाठी 398 धावांचे आव्हान दिले होते. मात्र मोहम्मद शमी याने सर्वाधिक 7 बळी घेत 48.5  षटकात 327  धावांपर्यंतच यूझीलंडला मजल मराता आली.

 

 

न्यूझीलंडकडून डॅरेल मिचेल याने सर्वाधिक 134 धावांची खेळी केली. कर्णधारकेन विलियमसन याने 69 धावा केल्या. ग्लेन फिलिप्स 41 धावांवर बाद झाला. सलामीवीर डेव्हॉन कॉनव्हे आणि रचिन रवींद्र या दोघांनी प्रत्येकी 13 धावा केल्या. टॉम लॅथमन याला भोपळाही फोडू दिला नाही. मिचेल सँटरने आणि टीम साऊथी या दोघांनी प्रत्येकी 9 धावा केल्या. तर टीम इंडियाकडून मोहम्मद शमी याने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. शमीने सर्वाधिक 7 बळी घेतले. जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव या तिघांनी प्रत्येकी 1-1  बळी घेतला.

 

भारतीय संघाने जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताकडून कर्णधार रोहित शर्मा याने 47 धावा केल्या. शुबमन गिल याने नाबाद 80 धावा. शुबमनला क्रॅममुळे मैदान सोडावं लागलं. त्यानंतर शुबमन गिल शेवटच्या काही षटकांसाठी मैदानात आला आणि त्याने काही धावा जोडल्या. विराट कोहली याने 113 बॉलमध्ये 117 धावा केल्या. मुंबईकर लोकल बॉय श्रेयस अय्यर याने 105 धावांची शतकी खेळी केली. विकेटकीपर केएल राहुलने 39 धावांची नाबाद खेळी केली.

Local ad 1