बेकायदा दारू विकणाऱ्या हॉटेल चालकासह मद्यपींना न्यायालयाचा दणका ; सुनावणी ‘ही’ शिक्षा

पुणे : बेकायदा दारू विक्री आणि मद्यपींना न्यायालयाने जोरदार दणका दिला आहे. दोन गुन्ह्यांमध्ये ०२ हॉटेल मालक व ०८ मद्यपी ग्राहकांना न्यायालयाचे कामकाज संपेपर्यंत उभे राहणे आणि आर्थिक दंड ही ठोठावला. त्यामुळे बेकायदा मध्यविक्री करणारे आणि मद्यपीमध्ये एकच खळबळ उडाली आहे. (The court rebuked hoteliers and drunkards for selling illegal liquor)

 

 

 

पुणे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक क्र. 1 चे निरीक्षक समीर पाटील यांच्या पथकाने 23 सप्टेंबर रोजी सायंकाळी चिखली गावच्या हद्दीतील हॉटेल रूद्रांक्ष येथे कारवाई करून हॉटेल मालक माऊली बाळासाहेब चव्हाण याच्यासह इतर पाच मद्यपींना अटक केली. त्यात कमरू इकबाल शेख, मेहराज रियाज अन्सारी, कृष्णा राजेंद्र अरनाळ, गौरव अप्पासाहेब देवकुळे आणि शुभम केलास सोनावणे असे अटक केलेल्या मद्यपिंची नावे आहेत. (The court rebuked hoteliers and drunkards for selling illegal liquor)

 

 

 

तसेच निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, जी विभाग, पुणे या कार्यालयाने विमाननगर परीसरातील हॉटेल प्लॅन बी या ठिकाणी छापा मारून हॉटेल चालक/मालक आकाश राम कुलकर्णी याच्यासह इतर तीन मद्यपींना अटक करण्यात आली. त्यात राजू धनुसिंग पवार, शाहरूख बिलाल अहमद, नागेश गुंडाप्पा चव्हाण यांना 23 सप्टेंबर रोजी अटक करून गुन्हा नोंद केला आहे. (The court rebuked hoteliers and drunkards for selling illegal liquor)

 

 

महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ चे कलम ६८ (अ, ब) व ८४ अन्वये गुन्हा नोंद करून सदर गुन्ह्याचा तपासपूर्ण करून 27 सप्टेंबर रोजी दोषारोपत्रास पिंपरी व शिवाजीनगर येथील न्यायालयात आरोपींना हजर करण्यात आले. त्यात पिंपरी न्यायालयाने प्रत्येक आरोपीस एक हजार रुपये दंड आणि कोर्ट उठेपर्यंत शिक्षा ठोठावली. तर शिवाजीनगर न्यायालयाने प्रत्येक आरोपीस 500 रूपये याप्रमाणे दंड ठोठावला.

 

 

राज्य उत्पादन शुल्कचे आयुक्त कांतीलाल उमाप, संचालक (अं. व. द.) सुनिल चव्हाण यांच्या आदेशान्वये पुणे विभागाचे विभागीय उप आयुक्त अनिल चासकर, अधीक्षक चरणसिंग राजपुत, उपअधीक्षक संजय आर. पाटि, युवरा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. (The court rebuked hoteliers and drunkards for selling illegal liquor)

 

ही कारवाईची निरीक्षक एस. एल. पाटील, बी. व्ही. ढवळे व दुय्यम निरीक्षक बी. एस. घुगे, एम. आर. राठोड, राजू आर. वाघ, सोपान कान्हेकर व सर्वश्री जवानवर्ग सुरज घुले, मुकुंद पोटे, जयराम काचरा, शरद हांडगर, संतोष गायकवाड, चंद्रकांत इंगळे, मोहन गवळी, दत्ता आबनावे व राहूल मोडक यांनी कारवाईत सहभाग घेतला.

 

Local ad 1