Pune news | कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांशी जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी साधला संवाद

Pune news पुणे | कोरोनामुळे पूर्ण अनाथ झालेल्या बालकांचे पुनर्वसन केले जाणार आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात आहेत. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख (dr.rajesh deshmukh collector pune) यांनी  कोरोनामुळे अनाथ झालेल्या 28 बालकांशी गुरुवारी संवाद साधला. विशेष म्हणजे या 28 बालकांचे बँक खाते भारतीय स्टेट बँकेच्या मुख्य शाखेत उघडण्यात आले. त्यावेळी जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी मुलांच्या अडचणी जाणून घेतल्या. (Collector Dr. Rajesh Deshmukh interacted with 28 orphans)

 

यावेळी अपर जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, भारतीय स्टेट बँकेचे सहायक प्रबंधक कृष्ण वेणी, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अश्विनी कांबळे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी परम आनंद यांच्यासह सबंधित यंत्रणेचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. (Collector Dr. Rajesh Deshmukh interacted with 28 orphans)

 

   जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, राज्य शासन तसेच संपूर्ण जिल्हा प्रशासन आपल्या सोबत आहे. कोणतीही काळजी करू नका, आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण आली तर लगेच आमच्याशी संपर्क करा, आम्ही कायम आपल्यासोबत आहोत. आपल्या सर्व अडचणी सोडविण्याच्या सूचना अधिका-यांना देण्यात आल्या आहेत, असा आधार देत जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी प्रत्येक बालकाशी संवाद साधला. तसेच कोरोना साथीमुळे पालक गमावलेल्या अनाथ बालकांच्या संरक्षण व संगोपन योग्यरीत्या व्हावे यासाठी अशा बालकांपर्यंत पोहोचून आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी. असे निर्देशही जिल्हाधिकारी डॉ.देशमुख यांनी दिले. (Collector Dr. Rajesh Deshmukh interacted with 28 orphans)

 

Local ad 1