नांदेडमध्ये आज किती रुग्ण सापडले ? जाणून घ्या…

नांदेड : नांदेड शहरासह ग्रामीण भागात कोरोना रुग्ण आढळत आहेत. शुक्रवारी एक हजार 960 जणांची चाचणी करण्यात आली. त्यातील 719 जण पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात नांदेड महापालिका क्षेत्रातील 352 रुग्ण आहेत. 481 रुग्ण बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. (How many patients were found in Nanded today? Find out …)

जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 1 हजार 960 अहवालापैकी 719 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 592 तर अँटिजेन तपासणीद्वारे 127 अहवाल बाधित आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 96 हजार 852 एवढी झाली असून यातील 90 हजार 382 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 3 हजार 812 रुग्ण उपचार घेत असून यात 3 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे.  (How many patients were found in Nanded today? Find out …)

 

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे सिडको नांदेड येथील 73 वर्षे वयाच्या महिलेचा 20 जानेवारी रोजी उपचारा दरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 658 एवढी आहे.

 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 335, नांदेड ग्रामीण 39, भोकर 2, देगलूर 3, धर्माबाद 1, कंधार 2, हदगाव 3, किनवट 72, लोहा 3, मुदखेड 1, मुखेड 19, नायगाव 1, हिमायतनगर 3, बिलोली 5, उमरी 40, अर्धापूर 5, माहूर 3, हिंगोली 5, परभणी 29, अकोला 1, हैदराबाद 1, निझामाबाद 1, औरंगाबाद 3, लातूर 1, जालना 1, नागपूर 1, वाशीम 6, यवतमाळ 2, पुसद 1, उमरखेड 2, अहमदनगर 1 तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा 17, नांदेड ग्रामीण 4, बिलोली 16, धर्माबाद 17, हदगाव 6, लोहा 3, देगलूर 28, मुखेड 3, नायगाव 6, उमरी 5, भोकर 2, कंधार 13, मुदखेड 7 असे एकुण 719 कोरोना बाधित आढळले आहे.

आज जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 9, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 398, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 67, खाजगी रुग्णालय 4, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 3 असे एकुण 481 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली. (How many patients were found in Nanded today? Find out …)

उपचार घेत असलेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपूरी 26, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 4, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 709, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण 3 हजार 48, हदगाव कोविड रुग्णालय 1, खाजगी रुग्णालय 22, बिलोली कोविड रुग्णालय 2 असे एकुण 3 हजार 812 व्यक्ती उपचार घेत आहेत.

Local ad 1