मुलीचा शाळा सोडल्याचा दाखला देण्यासाठी 400 रुपयांची लाच घेताना मुख्याधिपिका अटक

NANDED ACB TRAP नांदेड  : नाशिकच्या शिक्षण अधिकारी यांना लाच घेताना अटक केल्याची घटना ताजी असतानाच नांदेड जिल्ह्यातही शिक्षकी पेशाला शरमेने मान खाली घालायला लावणारी घटना घडली आहे. शाळेच्या मुख्याध्यापिकेने शाळा सोडल्याचा दाखला देण्यासाठी सहाशे रुपयांची लाच मागितली. तडजोडीनंतर 400 रुपये स्वीकारताना एसीबीच्या पथकाने अटक केली. यामुळे नांदेड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. (Headmistress arrested for taking bribe of Rs 400 to give school leave certificate of girl)

 

 

  • आरोपी : वीणा नेम्मानीवार, वय 41 वर्षे, पद – मुख्याध्यापिका, सरस्वती विद्या मंदिर प्राथमिक शाळा, किनवट, रा. वेल्मापुरा, किनवट, ता. किनवट, जि. नांदेड.
  • तक्रार प्राप्त – दि.16/06/2023
  • लाच मागणी पडताळणी – दि. 17/06/2023
  • लाचेची मागणी रक्कम  600/- रूपये  तडजोडीअंती लाच स्विकारली – 400/- रूपये
  • लाच स्विकारली दिनांक* – 17/06/2023

तक्रारदार यांनी मुख्याधिपिका वीणा नेम्मानीवार यांच्याकडे त्यांचे मुलीचे सन 2022-23 या वर्षाची 7 वी उत्तीर्ण झाल्याचे शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र (टी.सी.)  मागणी केली. मुख्याध्यापिका यांनी टी. सी. काढण्यासाठी 600/- रूपये दयावे लागतील असे सांगितले. तेव्हा तक्रारदार यांनी त्यांना 600/- रूपये कशाचे असे विचारणा केली असता, त्यांनी 600/- रुपये दयावेच लागतात असे म्हणाले. नमूद 600/- रुपये ही लाच असल्याची तक्रारदार यांना खात्री झाल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड येथे याबाबत तक्रार दिली.

त्यावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेडकडून लाच मागणीची पडताळणी केली असता, पडताळणी दरम्यान तक्रारदार यांना लोकसेवक मुख्याध्यापिका यांनी 200/- रूपये कमी करून 400/- रूपये ची मागणी केली, तेव्हा तक्रारदार यांनी याची पावती असते का असे विचारणा केली असता, त्यांनी याची पावती नसते असे कळवुन 400/- रूपये लाचेची मागणी शासकीय पंचासमक्ष केली.

   मुख्याध्यापिका यांनी तडजोडीअंती ठरलेली 400/- रूपये लाचेची रक्कम शासकीय पंचासमक्ष स्विकारली. लाचेची रक्कम स्विकारल्यानंतर तक्रारदार यांनी पावतीची मागणी केली असता, लोकसेवक मुख्याध्यापिका यांनी याची पावती नसते असे कळविले.  यावरून आरोपी लोकसेवक मुख्याध्यापिका यांना ताब्यात घेतले असून पोलीस स्टेशन किनवट, ता. किनवट, जि. नांदेड येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

अँटी करप्शन ब्युरो,नांदेड परिक्षेत्राचेपोलीस अधीक्षकडॉ. राजकुमार शिंदे, पोलीस उप अधीक्षक राजेंद्र पाटील, यांच्या मार्गदर्शनात सापळा तपास अधिकारी पोलीस निरीक्षक कालिदास ढवळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.  या पथकात सपोउपनि गजेंद्र मांजरमकर, मपोह मेनका पवार, पोकॉ सय्यद खदीर, चापोह मारोती सोनटक्के, चापोना प्रकाश मामुलवार आदींचा सहभाग होता.

Local ad 1