दिव्यांग दाखला मिळवून देतो म्हणून फोन पे द्वारे स्वीकारली दोन हजार रुपयांची लाच

परभणी : परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टर (Doctor at Parbhani District General Hospital) ओळखीचे असून, तुम्हांला दिव्यांग प्रमाणपत्र काढून देतो. म्हणून फोन पे द्वारे दोन हजार रुपयांची लाच स्वीकारणारा खासजी व्यक्ती एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे. (2000 rupees bribe accepted through phone pay for getting disability certificate)

 

 

विष्णू बापूराव कोरडे (वय -32, रा. ठाकरे नगर परभणी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. (2000 rupees bribe accepted through phone pay for getting disability certificate)

 

 

काय म्हणता..! शंभर रुपयाची लाच घेणारा सेवा सहकारी संस्थेचा सचिव एसीबीच्या जाळ्यात

तक्रारदार यांना आरोपी विष्णू याने त्याची जिल्हा सामान्य रुग्णालय परभणी मधील डॉक्टरांची ओळख आहे. तुम्हांला दिव्यांगाचे प्रमाणपत्र जिल्हा सामान्य रुग्णालय, परभणी येथून काढून देतो, असे सांगून तीन हजार रुपये घेतले. त्यानंतर बुधवारी करण्यात आलेल्या पडताळणीमध्ये पुन्हा पंचासमक्ष दोन हजार रुपयांची मागणी केली. तसेच दिव्यांग प्रमाणपत्र मिळाल्यानंतर आणखी पाच हजार रुपये द्यावे लागतील असे सांगितले. पो. स्टे. नानलपेठ,परभणी येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

एसीबी पोलीस अधीक्षक डॉ.राजकुमार शिंदे, पोलीस उप अधीक्षक अशोक इप्पर, सापळा/तपास अधिकारी पोलीस निरीक्षक बसवेश्वर जकीकोरे (ACB Superintendent of Police Dr.Rajkumar Shinde, Deputy Superintendent of Police Ashok Ipar, Trap/Investigation Officer Police Inspector Basaveshwar Jakikore) , पोहेकॉ मिलिंद हनुमंते, चंद्रशेखर निलपत्रेवार, पोकॉ मो. जिब्राईल, राम घुले, चापोह कदम अँटी करप्शन ब्यूरो, युनिट परभणी यांनी ही कारवाई केली.

नागरिकांना आवाहन

परभणी  जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजेंट) यांनी कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास आमच्याशी तात्काळ खालील दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. कार्यालय दूरध्वनी 02452-220597
टोल फ्री क्र. 1064

Local ad 1